शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
4
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
5
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
6
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
7
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
8
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
9
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
10
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
11
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
12
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
13
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
14
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
15
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
18
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
19
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
20
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...

Maharashtra Cabinet Reshuffle: केंद्रानंतर राज्यातही मंत्रिमंडळ फेरबदलाचे वारे; काँग्रेसच्या दोन मंत्र्यांना वगळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 12:22 IST

CM Uddhav Thackeray cabinet reshuffle: काँग्रेसच्या नेत्यांनी सर्व कॅबिनेट मंत्र्यांच्या कामकाजाची माहिती घेतली आहे. याची समिक्षा करून दोन काम न करणाऱ्या किंवा प्रदर्शन खराब असलेल्या मंत्र्यांना हटविण्यात येणार आहे. काँग्रेसने त्यांच्या वाट्याला आलेल्या दोन मंत्र्यांकडील खाती काढून घेण्याचा प्रस्तावही तयार केला आहे. 

केंद्रात मंत्रीमंडळाचा पूर्ण चेहरा मोहरा बदलल्यानंतर (Union Cabinet Expansion) आता राज्यातही मंत्रिमंडळ विस्तारासोबत (Maharashtra Cabinet Expansion) काही मंत्र्यांना डच्चू मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे काँग्रेसकडून तसा प्रस्ताव जाण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वीच काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे आणि एच. के. पाटील मुंबईत आले होते. यावेळी हा निर्णय झाल्याचे समजते आहे. (Maharashtra: Congress will replace 2 of its ministers in CM Uddhav Thackreay government.)

काँग्रेसच्या एका वरिष्ठ मंत्र्याने सांगितले की, काँग्रेसच्या नेत्यांनी सर्व कॅबिनेट मंत्र्यांच्या कामकाजाची माहिती घेतली आहे. याची समिक्षा करून दोन काम न करणाऱ्या किंवा प्रदर्शन खराब असलेल्या मंत्र्यांना हटविण्यात येणार आहे. काँग्रेसने त्यांच्या वाट्याला आलेल्या  खात्यांपैकी दोन मंत्र्यांकडील खाती काढून घेण्याचा प्रस्तावही तयार केला आहे. 

अकार्यक्षम मंत्र्यांची यादी बनविलीया मंत्र्यांनी सांगितले की, कोरोना काळात काही मंत्री कुठेच दिसले नाहीत. ज्या मंत्र्यांना डच्चू दिला जाणार आहे त्यांची यादी बनविण्यात आली आहे. आता सारे मुख्यमंत्री आणि राज्यपालांच्या उपलब्धतेवर अवलंबून आहे. 

महत्वाचे म्हणजे या दोन मंत्र्यांमध्ये एक मुंबईतील आणि दुसरे विदर्भातील असल्याचे लोकमतला सुत्रांनी सांगितले आहे. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदासह मंत्रीपदाची जबाबदारी दिली जाण्य़ाची शक्यता आहे. तसेच खर्गे, पाटील आणि बाळासाहेब थोरात यांनी नुकतीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. 

विधानसभा अध्यक्षपदाचे नाव निश्चितएका ज्येष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळात दोन ते तीन मंत्री बदलले जातील. विधानसभेच्या अध्यक्षपदासाठीचे नाव निश्चित झाले आहे. त्यासाठी पक्षाचे प्रभारी पाटील, बाळासाहेब थोरात, बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, हे तिघे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेणार आहेत. (CM Uddhav Thackeray may soon reshuffle his cabinet)

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारMaharashtraमहाराष्ट्रcongressकाँग्रेसNana Patoleनाना पटोले