शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

 Maha Opinion Poll : पश्चिम बंगालमध्ये भाजपा मोठा पक्ष ठऱणार, तृणमूलची घसरगुंडी उडणार; पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 22:03 IST

West Bengal Assembly Elections 2021 : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता काही काळ ऊरला असताना पश्चिम बंगलामधील सध्याच्या राजकीय परिस्थितीचे चित्र दाखवणारे अजून एक ओपिनियन पोल समोर आले आहे.

नवी दिल्ली - आठ टप्प्यात होणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी २७ मार्चपासून सुरुवात होणार आहे. (West Bengal Assembly Elections 2021) दरम्यान, मतदानाला आता काही काळ ऊरला असताना पश्चिम बंगलामधील सध्याच्या राजकीय परिस्थितीचे चित्र दाखवणारे अजून एक ओपिनियन पोल समोर आले आहे. या ओपिनियन पोलमधून पश्चिम बंगालमध्ये भाजपा (BJP) सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे. तर तृणमूल काँग्रेसची दुसऱ्या क्रमांकावर घसगुंडी होण्याची शक्यता आहे. बंगालमध्ये दीर्घकाळ सत्ता राहिलेल्या डाव्या पक्षांची काँग्रेससोबत मोठी घसरगुंडी होण्याची शक्यता आहे. (BJP to be big party in West Bengal, Trinamool to fall Number secound)मतदारांच्या मनातील कल जाणून घेण्यासाठी करण्यात आलेल्या हल्लीच्या काळातील विविध ओपिनियन पोलची आकडेवारी गोळा करून त्या आकडेवारीच्या विश्लेषणातून इंडिया टीव्हीने महाओपिनियन पोल मांडला आहे. या आकडेवारीनुसार भाजपा पश्चिम बंगालमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरेल. मात्र बहुमतासाठी भाजपाला काही जागा कमी पडू शकतात. तर ममता बॅनर्जींचा पक्ष दुसऱ्या क्रमांकावर राहील. या महाओपिनियन पोलसाठी वापरण्यात आलेल्या विविध ओपिनियन पोलची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. पिपल्स प्लस च्या ओपिनियन पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये भाजपाला १८३ जागा मिळू शकतात. तर ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला ९५ जागांवर समाधान मानावे लागू शकते. तर काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या आघाडीला केवळ १६ जागा मिळतील. सीएनएक्सच्या ओपिनियन पोलच्या आकडेवारीनुसार पश्चिम बंगालमध्ये कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही. २३ मार्च रोजी केलेल्या या ओपिनियन पोलनुसार तृणमूल काँग्रेसला १४१ तर भाजपाला १३५ जागा मिळतील. कांग्रेस आणि डाव्या आघाडीला १८ जागा मिळतील.  सी-वोटरच्या ओपिनियन पोलमध्ये तृणमूल काँग्रेस बहुमत मिळवून सर्वात मोठा पक्ष ठरेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर भाजपा दुसऱ्या क्रमांकावर राहील, असे म्हटले आहे. तृणमूल काँग्रेसला १६०, भाजपाला ११२ तर काँग्रेस आणि डाव्या आघाडीला २२ जागा मिळतील, असा या ओपिनियन पोलचा अंदाज आहे.  

या सर्व ओपिनियन पोलचे सार म्हणून मांडण्यात आलेल्या महा ओपिनियन पोलच्या आकडेवारीनुसार पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरेल. तर तृणमूल दुसऱ्या क्रमांकावर राहील. तर डाव्या आणि काँग्रेसच्या आघाडीला तिसरे स्थान मिळेल. महा ओपिनियन पोलच्या आकडेवारीनुसार पश्चिम बंगालमध्ये भाजपाला १४३, तृणमूल काँग्रेसला १३२ आणि काँग्रेस-डाव्या आघाडीला १९ जागा मिळू शकतात. 

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१BJPभाजपाTrinamool Congressतृणमूल काँग्रेसcongressकाँग्रेसPoliticsराजकारण