बॉक्सर विजेंदर सिंह निवडणुकीच्या रिंगणात; दिल्लीतून काँग्रेसच्या तिकीटावर लढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 00:21 IST2019-04-23T00:11:46+5:302019-04-23T00:21:17+5:30

दक्षिण दिल्लीतून विजेंदर सिंहला उमेदवारी 

lok sabha elections 2019 boxer vijender singh congress candidate from south delhi | बॉक्सर विजेंदर सिंह निवडणुकीच्या रिंगणात; दिल्लीतून काँग्रेसच्या तिकीटावर लढणार

बॉक्सर विजेंदर सिंह निवडणुकीच्या रिंगणात; दिल्लीतून काँग्रेसच्या तिकीटावर लढणार

नवी दिल्ली: काँग्रेसनं बॉक्सर विजेंदर सिंहला दक्षिण दिल्लीतून उमेदवारी दिली आहे. काँग्रेसनं दिल्लीतल्या सातही जागांवरील उमेदवार निश्चित केले आहेत. काल सकाळी काँग्रसनं दिल्लीतल्या सहा जागांवरील उमेदवार निश्चित केले होते. पश्चिम दिल्लीतून महाबल मिश्रा, उत्तर पश्चिम दिल्लीतून राजेश लिलोठिया, नवी दिल्लीमधून अजय माकन, पूर्व दिल्लीतून अरविंदर सिंह लवली, उत्तर पूर्व दिल्लीतून शीला दीक्षित आणि चांदनी चौकमधून जेपी अग्रवाल यांना तिकीट देण्यात आलं आहे. 


दक्षिण दिल्लीत विजेंदरसमोर भाजपाच्या रमेश बिधुडी आणि आम आदमी पार्टीच्या राघव चड्ढा यांचं आव्हान असेल. दिल्लीत 12 मे रोजी मतदान होणार आहे. काँग्रेसनं दक्षिण दिल्लीतून तिकीट दिल्यानंतर विजेंदरनं ट्विट केलं. '20 पेक्षा जास्त वर्षांच्या बॉक्सिंग करिअरमध्ये मी कायम देशाला सन्मान मिळवून दिला. आता देशवासीयांसाठी काहीतरी करुन दाखवायची वेळ आली आहे. त्यांची सेवा करायची आहे. मी ही सेवेची संधी स्वीकारतो आहे. यासाठी मी काँग्रेस पक्ष, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचा आभारी आहे,' असं विजेंदरनं ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

Web Title: lok sabha elections 2019 boxer vijender singh congress candidate from south delhi