शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

पवार, राहुल गांधींकडून देशाच्या विभाजनाचा प्रयत्न; अमित शहांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 17:25 IST

तासगावमधील सभेत अमित शहांचा काँग्रेस, राष्ट्रवादीवर घणाघात

तासगाव : काश्मिरमधील स्थिती अतिशय गंभीर आहे. तेथील नेते फारूख अब्दुल्ला काश्मीरसाठी स्वतंत्र पंतप्रधान हवा, असे विधान करत आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार त्यांच्या भूमिकेला पाठिंबा देत आहेत. कोणत्याही स्थितीत देशाला दोन पंतप्रधान नको आहेत असे म्हणत पवार व राहुल गांधी यांचा देशाच्या विभाजनाचा प्रयत्न करत आहेत, असा घणाघाती आरोप भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी बुधवारी केला. तासगाव येथील विद्यानिकेतन महाविद्यालयाच्या मैदानावर भाजपचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. शरदराव आणि कंपनीने पंधरा वर्षांच्या काळात ७२ हजार कोटींचा गैरव्यवहार सिंचन योजनेतून केल्याचे सांगत शहा यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी संजय पाटील यांना विजयी करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. शहा म्हणाले, राहुल गांधी आणि शरद पवार देशातील गरिबी हटवण्याची भाषा करत आहेत. परंतु माझा त्यांना प्रश्न आहे की, त्यांनी आतापर्यंत गरिबी हटवण्यासाठी काय केले, हे आधी सांगावे. गेल्या पाच वर्षात आम्ही ७ कोटी कुटुंबांना उज्ज्वला गॅस योजनेचे कनेक्शन दिले. ८ कोटी कुटुंबांना शौचालये दिली. अडीच कोटी कुटुंबांना घरे दिली. २ कोटी ३५ लाख कुटुंबांना वीज दिली. तर ५० कोटी जनतेला आयुष्यमान भारत योजनेतून प्रत्येकी ५ लाख रुपयांचे आरोग्य संरक्षण दिले.  देश काँग्रेसच्या हातात सुरक्षित राहू शकत नाही, असं शहा म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदीच देशाचे संरक्षण करु शकतात. त्यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करुया. केंद्रात पुन्हा सत्ता आल्यानंतर काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंतचे सर्व घुसखोर देशातून हाकलून देऊ. ४० लाखांपेक्षा कमी उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांचा जीएसटी माफ करणार आहे. ६० लाखांपेक्षा कमी उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांना आयकरातून मुक्ती देणार आहे.भाजपा अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाचंही कौतुक केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३५ लाख शेतकऱ्यांना ३७ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली. बाहेरील उद्योगपतींनी राज्यात ४० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून ६ हजार कोटी रुपये खर्च केले. राज्यातील १२ हजार गावांना पाणीदार बनवले. गेल्या अनेक वर्षापासून सवर्ण समाज आरक्षण मागत होता. हा प्रश्न काँग्रेसला सोडवता आला नाही. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनेत तरतूद करुन सवर्णांना १० टक्के आरक्षण दिले.

एअर स्ट्राईकसाठी शिवाजी महाराजांचा गनिमी कावायूपीए सरकारने दहा वर्षे पाकिस्तानच्या बाबतीत मवाळ भूमिका घेतली. यामुळे शेफारलेल्या पाकिस्तानने उरीत हल्ला केला. त्याचा बदला घेण्यासाठी पंतप्रधान मोदींनी सर्जिकल स्ट्राईक केला. तरीही पाकिस्तान सुधारला नाही. पुलवामामध्ये दहशतवादी घडवून आणला. या हल्ल्यात देशाचे ४० जवान शहीद झाले. यानंतर  मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी कावा या तंत्राचा अवलंब केला. सीमेवर सैन्य तैनात ठेवले आणि हवाई दलामार्फत हल्ला करुन बालाकोटमधील दहशतवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला.या सभेला गृहराज्यमंत्री रणजित पाटील, आमदार सुरेश खाडे, शिवाजीराव नाईक, सुधीर गाडगीळ, अनिल बाबर, सुरेश हळवणकर, अजितराव घोरपडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, सांगलीच्या महापौर संगीता खोत यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019sangli-pcसांगलीAmit Shahअमित शहाSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा