शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

भगतसिंगांबद्दल मोदींनी केलेला 'तो' दावा धादांत खोटा- राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 21:43 IST

पंतप्रधान मोदी देशवासियांशी सर्रास खोटं बोलत असल्याचा आरोप

नांदेड: क्रांतीकारक भगतसिंह तुरुंगात असताना त्यांना भेटायला काँग्रेसचा एकही नेता गेला नाही, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका सभेत केला होता. मोदींचा हा धोटा पूर्णपणे खोटा असल्याचं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पंतप्रधानांचा समाचार घेतला. मूळ मुद्द्यांना बगल देण्यासाठी मोदी कोणतेही विषय उकरून काढतात. 2014 मध्ये दिलेल्या आश्वासनांवर, दाखवलेल्या स्वप्नांवर मोदी का बोलत नाहीत, असा सवाल राज यांनी उपस्थित केला. ते नांदेडमध्ये बोलत होते. पंतप्रधान मोदींचं गेल्या वर्षातील एका भाषणाचा काही भाग राज ठाकरेंनी सभेत दाखवला. त्यात मोदींनी क्रांतीकारक भगतसिंहांना तुरुंगात भेटण्यासाठी काँग्रेस परिवारातील एकही नेता गेला नाही, अशी टीका केली होती. यावर बोलताना मोदी देशाला चुकीचा इतिहास सांगत असल्याचं राज म्हणाले. काँग्रेस परिवारातील एकही नेता गेला नाही, म्हणजे नेमकं कोण गेलं नाही? जवाहरलाल नेहरु गेले नाहीत, सरोजिनी नायडू गेल्या नाहीत की सरदार वल्लभभाई पटेल गेले नाहीत? मोदींना नेमकं म्हणायचंय का? असे प्रश्न मोदींनी उपस्थित केले.पंतप्रधान मोदी आता बोललेच आहेत, तर त्यावेळची एक बातमी तुम्हाला दाखवतो, असं म्हणत राज यांनी 'द ट्रिब्युन' दैनिकात प्रसिद्ध झालेली एक बातमी दाखवली. भगतसिंह तुरुंगात असताना दोनवेळा त्यांची भेट घेणारे नेहरु हे देशातील एकमेव नेते होते, असं राज बातमी दाखवून म्हणाले. नेहरु दोनदा भगतसिंहांना तुरुंगात भेटायला गेले होते. ऑगस्ट 1929 मध्ये ही बातमी वर्तमानपत्रात छापून आली. त्यावेळी इंदिरा गांधी फक्त 14 वर्षांच्या होत्या. त्यामुळे संजय गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधींचा तर प्रश्नच येत नाही, असं म्हणत राज यांनी मोदी सर्रास खोटं बोलत असल्याचा आरोप केला.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019nanded-pcनांदेडNarendra Modiनरेंद्र मोदीRaj Thackerayराज ठाकरेJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूBhagat SinghभगतसिंगIndira Gandhiइंदिरा गांधीcongressकाँग्रेस