शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

'मोदीजी, व्यासपीठावर शहिदांचे फोटो लावून भाषणं करायला लाज वाटत नाही का?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 21:04 IST

राज ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

नांदेड: पुलवामात शहीद झालेल्या जवानांचे फोटो व्यासपाठीवर लावून भाषणं करायला पंतप्रधान नरेंद्र मोदींना लाज वाटत नाही का?, असा सवाल करत मनसे प्रमुख राज ठाकरेंनी पंतप्रधानांवर हल्लाबोल केला. पुलवामात शहीद झालेल्या जवानांच्या नावानं मतं कसली मागता? एअर स्ट्राइक करणाऱ्या जवानांच्या नावानं मतांचा जोगवा कशासाठी? निवडणुकीला शहीद जवान उभे आहेत की एअर स्ट्राइक करणारे विंग कमांडर अभिनंदन?, असे सवाल करत राज यांनी पंतप्रधानांना लक्ष्य केलं. ते नांदेडमध्ये बोलत होते. नोटाबंदीनंतर केलेल्या भाषणात मोदी स्वत:च्या जीवाला धोका आहे, असं म्हणत होते. मग हेच मोदी आता देश सुरक्षित हातात असल्याचं कसं काय सांगतात? जो माणूस स्वत:च्या जीवाला धोका असल्याचं सांगतो. तोच माणूस त्याच्या हातात देश सुरक्षित आहे, असं कसं काय म्हणतो?, जो माणूस स्वत:चं असुरक्षित आहे, त्याच्या हाती देश सुरक्षित कसा असू शकतो?, असे प्रश्न उपस्थित करत राज यांनी पंतप्रधान मोदींवर तोफ डागली. ज्यावेळी मोदी त्यांच्या हातात देश सुरक्षित आहे, असं म्हणत होते. त्यावेळी त्यांच्या व्यासपीठावर पुलवामातील शहीद जवानांचे फोटो होते. मोदीजी, जवानांचे फोटो व्यासपीठावर लावून मतं मागायला तुम्ही लाज वाटत नाही का?, असा प्रश्न राज यांनी विचारला. पुलवामा हल्ल्यासाठी वापरण्यात आलेलं आरडीएक्स आलं कुठून याचं उत्तर मोदींनी देशाला द्यावं, अशी मागणी राज यांनी केली. एअर स्टाईकमध्ये किती दहशतवादी मारले गेले, त्याचा आकडा माहीत नसल्याचं हवाई दलाचे प्रमुख सांगतात. मग त्याआधीच भाजपाचे अध्यक्ष अमित शहा 250 दहशतवादी मारल्याचा दावा कसा काय करतात?, असा सवाल विचारत मोदी आणि शहा हे देशाच्या क्षितिजावरुन दूर होणं गरजेचं असल्याचं राज म्हणाले. देशाच्या 40 जवानांचे प्राण हकनाक गेले. त्या जवानांच्या कुटुंबीयांनी एअर स्ट्राइकचे पुरावे मागितल्यावर त्यांना भाजपा नेता देशद्रोही कसा काय म्हणतो?, असा सवाल राज यांनी विचारला. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019nanded-pcनांदेडRaj Thackerayराज ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीMNSमनसेBJPभाजपाAmit Shahअमित शहाpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक