शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मोदींना ना बायको, ना मुलं; त्यांना कुटुंबाचं काय मोल?; शरद पवारांचा वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 16:51 IST

मोदींच्या कुटुंबावरील टीकेला शरद पवारांचं प्रत्युत्तर  

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कुटुंबावरील टीकेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं. मोदींना बायको, मुलं नाहीत. त्यामुळे त्यांना कुटुंबाचं मोल कसं करणार?, असा सवाल पवार यांनी विचारला. मोदींनी प्रचारसभेत पवार कुटुंबात सर्वकाही आलबेल नसल्याचं म्हणत हल्ला चढवला होता. मोदींच्या या विधानावर पवारांनी पलटवार केला. 'माझ्या घरात मुलगी, पत्नी, नातेवाईक आहेत. आमचं मोदींसारखं नाही. त्यांच्या घरात कोणीच नाही. त्यामुळे त्यांना कुटुंब चालवण्याचा अनुभव नाही. त्यामुळे दुसऱ्यांच्या कुटुंबात नाक खुपसणं बंद करा, असं मी त्यांना सांगेन,' असं पवार म्हणाले. मोदींनी त्यांच्या महाराष्ट्रातील प्रचारसभेतील राजकारणातील घराणेशाहीवर सडकून टीका केली. त्यावेळी पंतप्रधानांनी पवार कुटुंबावर सर्वाधिक हल्ला चढवला होता. मोदींनी केलेल्या टीकेला पवारांनी दुसऱ्यांदा प्रत्युत्तर दिलं. रविवारीदेखील शरद पवारांनी मोदींवर शरसंधान साधलं होतं. 'पंतप्रधान एकाकी आयुष्य जगत आहेत. त्यामुळे कुटुंब कसं चालतं याची जाणीव त्यांना नाही. मोदी आजकाल सतत माझ्या कुटुंबावर टीका करतात. पण त्यांना कुटुंब काय असतं, याची कल्पना नाही. त्यामुळे त्यांनी नको त्या ठिकाणी नाक खुपसणं बंद करावं,' असं टीकास्त्र पवार यांनी बीडमधील आष्टीत झालेल्या सभेत सोडलं होतं.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Narendra Modiनरेंद्र मोदीSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा