शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
4
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
5
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
6
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
7
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
8
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
9
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
10
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
11
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
12
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
13
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
14
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
15
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
20
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाला मतदान करा, अन्यथा हिंसाचार घडवू; मणिपुरात बंडखोर गटाची ग्रामस्थांना धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 17:52 IST

भाजपा उमेदवारासाठी बंडखोर गटाच्या गावांमध्ये सभा

मणिपूर: लोकसभा निवडणुकीच्या आधी मणिपूरमधील गावांच्या सरपंचांना बंडखोर गट असलेल्या कुकी नॅशनल आर्मीनं धमकी दिली आहे. भाजपाला मतदान करा, अन्यथा परिणामांना सामोरे जा, अशी धमकी कुकी आर्मीनं दिली. भाजपाला 90 टक्के मतदान न झाल्यास त्याचे परिणाम लोकांना भोगावे लागतील, असा इशारा देण्यात आला आहे. कुकी नॅशनल आर्मीचा कमांडर थांगबोई हाओकिपनं मुनतफई आणि मोरेह गावात सभेचं आयोजन केलं होतं. यावेळी गावांचे सरपंचदेखील उपस्थित होते. या सभेत थांगबोईनं भाजपाचे उमेदवार एचएस बेंजामिन मेट यांचा उल्लेख केला. गरज पडल्यास हिंसाचाराचा आधारदेखील घेतला जाईल, असा इशारा थांगबोईंनी सभेत दिला. ग्रामस्थांना आदेशाचं पालन करावंच लागेल. अन्यथा परिणामांना सामोरं जावे लागेल, अशी धमकी थांगबोईनं दिली.गटात महिलांची संख्या कमी असूनही 11 एप्रिलला 200 महिलांची एक विशेष तुकडी मतदान केंद्रांवर तैनात असेल, असं थांगबोईनं सांगितलं. पुरुष असो वा महिला, प्रत्येकाला आदेश मानावा लागेल. अन्यथा कोणालाही सोडणार नाही, असंदेखील त्यानं सभेला उपस्थित असणाऱ्यांना सांगितलं. 'मोरेह क्षेत्रात 21 मतदान केंद्रं आहेत. या ठिकाणच्या मतदानाच्या टक्केवारीची पडताळणी केली जाईल,' असं थांगबोईनं म्हटलं.  कुकी नॅशनल आर्मीची स्थापना 1988 मध्ये झाली आहे. या संघटनेच्या पहिल्या कॅडरला म्यानमारमध्ये काचिन इंडिपेंडंट आर्मीनं प्रशिक्षण दिलं होतं. या संघटनेकडून एके-सीरीज, जी-सीरिज, एम-सीरिज रायफल्स आणि 60 एमएम मोर्टारसारख्या धोकादायक हत्यारांचा वापर केला जातो. या संघटनेचे 600 सक्रिय सदस्य आहेत.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकManipur Lok Sabha Election 2019मणिपुर लोकसभा निवडणूक 2019BJPभाजपा