शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
2
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
3
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
4
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
5
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
6
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
7
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
8
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
9
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
10
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
11
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
12
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
13
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
14
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
15
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
16
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
17
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
18
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
19
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
20
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?

Lok Sabha Election 2019: सनी देओलला भाजपा देणार संधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 06:47 IST

अक्षयकुमारलाही मिळू शकते उमेदवारी; माधुरी दीक्षित, नाना पाटेकर यांच्या नावांचीही चर्चा

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत काहीही करून ३०० पेक्षा जास्त जागा जिंकण्याच्या प्रयत्नांतील भाजपा चित्रपट कलावंत, कादंबरीकार, सामाजिक कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्याच्या विचारात आहे. मुंबईत अभिनेत्री माधुरी दीक्षित व अभिनेते नाना पाटेकर यांच्या नावाची चर्चा आहे तर उत्तर प्रदेशात मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी अभिनेते सनी देओल यांना संधी देण्याच्या विचार होत आहे. त्यासाठी पक्षाचे काही नेते देओल यांच्या संपर्कात आहेत. सध्या देओल संमती देण्याबद्दल द्विधा मन:स्थितीत आहेत.पश्चिम उत्तर प्रदेशातून एका जागेवर देओल यांना उमेदवारी देण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. येथे पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात प्रत्येकी आठ जागांसाठी मतदान होईल. पहिल्या टप्प्यात ज्या जागांसाठी मतदान होईल त्या मतांच्या ध्रुवीकरणासाठी महत्वाच्या आहेत. येथील मुजफ्फरपूर, बागपत, मेरठ हे मतदारसंघ राष्ट्रभक्तीच्या मुद्यावर एकगठ्ठा मतांसाठी परिचीत आहेत. सनी देओल यांना राष्ट्रीय लोकदलचे अध्यक्ष अजित सिंह यांचे चिरंजीव जयंत चौधरी यांच्याविरुद्धही उभे केले जाऊ शकते, अशी चर्चा आहे. सनी देओल जाट असून ते ‘गदर- एक प्रेमकथा’ ‘इंडियन’ या चित्रपटांतून देशभक्त नायक म्हणून प्रेक्षकांना चांगले परिचित आहेत. पाकिस्तानात नुकत्याच करण्यात आलेल्या हवाई कारवाईमुळे जे देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे त्या पार्श्वभूमीवर सनी देओलचा लाभ पक्षाला होऊ शकतो.सनी देओल यांना निवडणुकीच्या रिंगणात आणण्याचा आमचा प्रयत्न असला तरी ते स्वत: गर्दी व झगमगाटापासून दूर राहणारे आहेत. त्यामुळे त्यांची संमती अजून मिळालेली नाही. आम्ही त्यांच्या वडिलांशी (धर्मेंद्र) याबद्दल बोलत आहोत. अभिनेते अक्षय कुमारदेखील भाजपाकडून रिंगणात उतरवले जाऊ शकतात. त्यांच्यावर सरकारच्या धोरणांचा परिणाम झाला आहे. निवडणूक लढायची की नाही हा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. त्यांची संमती असेल तर पक्षात क्वचितच त्यांना विरोध होईल, असे दुसऱ्या पदाधिकाºयाने सांगितले. उत्तर प्रदेशातील पिलिभीत मतदार संघाऐवजी मेनका गांधी करनालमधून निवडणूक लढवू इच्छितात. त्यांचा मुलगा वरूण गांधी याच्यासाठी पिलिभीत मतदारसंघ मिळणार असेल तर मी मतदारसंघ बदलायला तयार आहे, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. त्यांचे प्राधान्य करनालऐवजी कुरुक्षेत्रला आहे.वसुंधराराजे यांच्या जागेबद्दल संभ्रमराजस्थानात वसुंधरा राजे यांच्या जागेबद्दल संभ्रम आहे. त्यांचा प्रयत्न त्यांचा मुलगा दुष्यंत याला झालावाडमधून उमेदवारी देण्याचा आहे. पण भाजपा त्यांना तुम्हीच तेथून लढा, असे म्हणत आहे. निवडणुकीत वसुंधरा राजे यांना नाराज करून कोणतीही जोखीम भाजपाला घ्यायची नाही, असे समजते. परंतु, झालावाडमधून कोण लढणार हा पेच कायम आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSunny Deolसनी देओलAkshay Kumarअक्षय कुमारMadhuri Dixitमाधुरी दिक्षितNana Patekarनाना पाटेकर