शहरं
Join us  
Trending Stories
1
वायकर मेहुणे मोबाईल वाद पेटला! आता ठाकरे गटाच्या आमदारावरही गुन्हा दाखल
2
४-४-०-३! वर्ल्ड कप इतिहासातील भारी स्पेल, Lockie Ferguson ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, Video 
3
ओबीसी नेते एकवटू लागले! "आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही हे सांगा"; मुंडे बहीण-भाऊ हाकेंच्या भेटीला
4
Ohh No! सुपर ८ लढतीपूर्वी टीम इंडियाच्या प्रमुख शिलेदाराला दुखापत, वाचा अपडेट्स 
5
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
6
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
7
रिल्सच्या नादात तरुणीचा जीव गेला, रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून भीषण अपघात
8
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
9
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
10
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
11
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
12
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
13
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
14
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
15
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
16
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
17
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
18
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
19
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
20
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह

Lok Sabha Election 2019: माढ्यामध्ये देशमुख विरुद्ध मोहिते -पाटील लढत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 2:13 AM

नावे निश्चित, पण पक्षांनी ठेवला निर्णय राखून; विजयदादा की रणजितसिंह, हीच उत्सुकता

सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघात भाजपतर्फे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले असले तरी शरद पवार यांच्या भूमिकेवर पुढील निर्णय राखून ठेवला आहे. पवारांच्या माघारीनंतर खासदार विजयसिंह मोहिते-पाटील किंवा त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता होती; मात्र मंगळवारी अकस्मातपणे पुन्हा एकदा माणदेशातील प्रभाकर देशमुख यांच्या नावाची राष्ट्रवादी पक्षात चर्चा सुरू झाल्याने मोहिते-पाटील घराण्याच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.माढ्यात पवारांच्या विरोधात भाजपाकडे स्थानिक तगडा उमेदवार नसल्यामुळे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनाच उमेदवारी देण्याचा घाट घातला गेला होता; मात्र पवारांच्या माघारीनंतर भाजपाचाही उमेदवार बदलला जाणार का? याची चर्चा सुरू झाली होती. माढ्यात राष्टÑवादीचा उमेदवार कुणीही असो, भाजपाकडून सुभाष देशमुखच उभारणार अशी माहिती पक्षातील सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे, देशमुखांची कार्यकर्ते मंडळीही सोलापुरातून माढा लोकसभा मतदारसंघात प्रचाराला लागली आहेत.मंगळवारी अचानक प्रभाकर देशमुखांचे नाव चर्चेत आले. रणजितसिंह मोहिते-पाटील भाजपाचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना भेटण्यासाठी त्यांच्या बंगल्यावर गेल्यामुळे नव्या चर्चेला ऊत आला. प्रभाकर देशमुखांना राष्ट्रवादीची उमेदवारी दिली गेली तर मोहिते-पाटील भाजपामध्ये जाणार, अशाही बातम्या सोशल मीडियावर झळकल्या. राष्ट्रवादीकडून मोहिते-पाटील उभारले तर भाजपाकडून सुभाष देशमुख निवडणूक लढवतील. राष्ट्रवादीकडून प्रभाकर देशमुख यांना उमेदवारी मिळाली तर कदाचित भाजपाकडून मोहिते-पाटील यांना उभे केले जाईल, अशीही शक्यता रणजितसिंहांच्या महाजन भेटीमुळे व्यक्त केली जात आहे. याचा अर्थ माढ्यात देशमुख विरुद्ध मोहिते-पाटील अशीच लढत होईल.पवारांनी पुनर्विचार करावामाढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक न लढविण्याचा निर्णय मागे घेण्यासाठी शरद पवार यांनी पुनर्विचार करावा, अशी मागणी माढा येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली. मंगळवारी राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत निवडणूक लढविण्याबाबत पवारांना विनंती करण्यात आली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSubhash Deshmukhसुभाष देशमुखNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा