शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

LMOTY 2020: “अधिकाऱ्यांच्या हातातून चुका होत असतात, घटना घडत राहतात"; गृहमंत्री अनिल देशमुखांचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 14:24 IST

Home Minister Anil Deshmukh on Sachin Vaze Case: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांना किती गुण द्याल असं विचारलं असता त्यांनी १० पैकी ५ गुण देऊ असं अनिल देशमुख म्हणाले

ठळक मुद्देकोरोना काळात पोलीस दिवसरात्र मेहनत घेत होते, देशात महाराष्ट्र पोलिसांची चांगली  प्रतिमा आहेकाही अधिकाऱ्यांच्या हातून चुका होतात, त्या यापुढे होऊ नये यासाठी काळजी घेतली जाईलअजित पवार आणि जयंत पाटील दोघांनीही उत्तम पदाच काम केलं असतं

मुंबई – प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी(Mukesh Ambani Bomb Scare) आढळली होती, या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना NIA कडून अटक केली आहे. स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवण्यामागे सचिन वाझेंचा(Sachin Vaze) हात असल्याचा संशय NIA ला आहे, त्याप्रकारे NIA अधिकाऱ्यांचा तपास सुरू आहे, परंतु या घटनेमुळे विरोधकांनी ठाकरे सरकारची कोंडी केली आहे. अशातच मुंबई पोलीस दलावरही अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. 

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार(Lokmat Maharashtrian of the Year Awards) सोहळ्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केले आहे. मुंबई पोलीस(Mumbai Police) दलाने कोरोना काळात अतिशय उत्तमरित्या काम केले आहे, पोलीस दिवसरात्र मेहनत घेत होते, देशात महाराष्ट्र पोलिसांची चांगली  प्रतिमा आहे. काही अधिकाऱ्यांच्या हातून चुका होतात, त्या यापुढे होऊ नये यासाठी काळजी घेतली जाईल असं सांगत त्यांनी सचिन वाझे प्रकरणावर जास्त बोलणं टाळलं, परंतु या प्रकरणामुळे आपण राजीनामा देणार का? या प्रश्नावर त्यांनी थेट नाही असं उत्तर दिलं, माझा राजीनामा घेतला जाणार नाही, घटना घडत राहतात असं देशमुखांनी म्हटलं आहे. 

त्याचसोबत तुमच्या पक्षातला कोणता नेता यावेळी गृहमंत्री पदावर असता तर तुम्हाला आवडलं असतं? अजित पवार(Ajit Pawar) की जयंत पाटील?(Jayant Patil) या प्रश्नावर अनिल देशमुख म्हणाले की, दोन्ही नेते ज्येष्ठ नेते आहे. दोघांनी उत्तम काम केलेले आहे. अजित पवार आणि जयंत पाटील दोघांनीही उत्तम पदाच काम केलं असतं. आमच्या पक्षात सर्वच उत्तम नेते आहेत असं उत्तर त्यांनी दिलं, तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांना किती गुण द्याल असं विचारलं असता त्यांनी १० पैकी ५ गुण देऊ असं अनिल देशमुख म्हणाले तर स्वत:ला किती गुण द्याल असा प्रश्न विचारला असता, मला जनताच गुण देईल असं प्रत्युत्तर दिलं. 

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सचिन वाझे प्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिमेला तडा गेला आहे. अशातच राज्यात गृहमंत्री बदलावर चर्चा सुरु झाली होती, अनिल देशमुख यांची कामगिरी समाधानकारक नसल्याने त्यांना या पदावरून हटवावं अशी मागणी शिवसेनेच्या(Shivsena) एका गटाने केली होती, मात्र अनिल देशमुख यांची सचिन वाझे प्रकरणात कोणतीही चूक नाही, त्यांचा राजीनामा घेणार नाही असं सांगत राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अनिल देशमुखांची पाठराखण केली होती. 

सचिन वाझे यांना निलंबित केल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठका सुरू होत्या, त्यानंतर बुधवारी मुंबई पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंग(Parambir Singh) यांची उचलबांगडी करण्यात आली, त्यांच्या जागी हेमंत नगराळे(Hemant Nagrale) यांना मुंबई पोलीस आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली. सचिन वाझे प्रकरणात पोलीस दलातील आणखी काही अधिकाऱ्यांचीही चौकशी होणार असल्याची माहिती आहे. NIA ने वाझे यांना मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांचा शोध घेत आहेत, लवकरच या प्रकरणात अन्य बड्या अधिकाऱ्यांना समन्स बजावून चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे.

 

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेAnil Deshmukhअनिल देशमुखMumbai policeमुंबई पोलीसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारJayant Patilजयंत पाटीलlokmat maharashtrian of the year awardsलोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2020