बारा जणांच्या नावांची यादी राज्यपालांकडेच 'सापडली'; माहिती अधिकारात नसल्याचे कळविलेले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 06:58 AM2021-06-16T06:58:31+5:302021-06-16T06:59:42+5:30

‘लोकमत’च्या वृत्तावर शिक्कामोर्तब; अनिल गलगली यांच्या अर्जावर, ‘ही यादी राजभवन सचिवालयाकडे उपलब्ध नाही’ असे उत्तर देण्यात आले होते. त्यावर गलगली यांनी अपील केले होते.

list of names of the twelve was 'found' at Governor; Reported not to have in RTI | बारा जणांच्या नावांची यादी राज्यपालांकडेच 'सापडली'; माहिती अधिकारात नसल्याचे कळविलेले

बारा जणांच्या नावांची यादी राज्यपालांकडेच 'सापडली'; माहिती अधिकारात नसल्याचे कळविलेले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी राज्य मंत्रिमंडळाने पाठविलेली यादी ही राज्यपाल महोदयांकडेच असल्याचे स्पष्ट झाले आहे. राजभवनाकडे ही यादीच उपलब्ध नसल्याचे वृत्त मध्यंतरी एका माहिती अधिकाराच्या अनुषंगाने देण्यात आले होते.

अनिल गलगली यांच्या अर्जावर, ‘ही यादी राजभवन सचिवालयाकडे उपलब्ध नाही’ असे उत्तर देण्यात आले होते. त्यावर गलगली यांनी अपील केले होते. त्यावर, राजभवन सचिवालयाच्या  उपसचिव प्राची जांभेकर यांनी सुनावणी घेतली. ‘राज्यपालांकडे यादीसह संपूर्ण नस्ती आहे. निर्णय झाल्यावर माहिती देण्यात येईल. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने माहिती द्यावी किंवा नाही? याबाबत सल्लामसलत केली जाईल, असे जांभेकर यांनी स्पष्ट केले. ही यादी राज्यपालांकडेच असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने यापूर्वीच दिले होते.

Web Title: list of names of the twelve was 'found' at Governor; Reported not to have in RTI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.