शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

Maratha Reservation: “अशी दडपशाही करून आघाडी सरकारचं आरक्षण अपयश लोकं कसं विसरतील?”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2021 15:17 IST

Maratha Reservation: भाजपने महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला असून, अशी दडपशाही करून आघाडी सरकारचं आरक्षण अपयश लोकं कसं विसरतील, अशी विचारणा केली आहे.

ठळक मुद्देमहाविकास आघाडी सरकारवर भाजपचे टीकास्त्रमराठा आरक्षण मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारवर साधला निशाणाकेशव उपाध्ये यांनी ट्विटरवरून केली विचारणा

मुंबई:मराठा आरक्षण, ओबीसींचे राजकीय आरक्षण, पंढरपूरची पायी वारी यांवरून सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर भाजपकडून टीका करण्यात येत आहे. यावरून आरोप-प्रत्यारोपही होताना पाहायला मिळत आहेत. त्यातच पायी वारीवर ठाम असलेल्या बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी ताब्यात वडमुखवाडी चरहोली येथे स्थानबद्ध करण्यात आले. तर, दुसरीकडे मराठा आरक्षण मोर्चाच्या पार्श्वभूमी सोलापूरमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावरून भाजपने महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला असून, अशी दडपशाही करून आघाडी सरकारचं आरक्षण अपयश लोकं कसं विसरतील, अशी विचारणा केली आहे. (keshav upadhye criticised maha vikas aghadi govt over maratha reservation and pandharpur payi wari)

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सोलापुरात आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सहभागी होण्यासाठी जात असताना आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील व आमदार प्रशांत परिचारक यांना पोलिसांनी अडविले. तसेच शेकडो कार्यकर्त्यांनी सोलापूर - पुणे महामार्ग रोखला. या भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावरून भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडीवर टीका करत ही दडपशाही कशासाठी अशी विचारणा केली आहे. 

मग ही दडपशाही कशासाठी?

काल वारकऱ्यावर कारवाई आज सोलापूरात मराठा समाजाचा मोर्चा निघू नये म्हणून अभूतपूर्व बंदोबस्त आहे. आजूबाजूच्या जिल्ह्यातील पोलिस फौजफाटा, सर्व बाजूने रस्ते बंद.. मराठा समाजाने शांततेत मोठे मोर्चे काढलेत मग ही दडपशाही कशासाठी? अशी दडपशाही करून आघाडीसरकारच आरक्षण अपयश लोक कस विसरतील?, असे सवाल केशव उपाध्ये यांनी ट्विटरच्या माध्यमातून केले आहेत. 

सरकार बिल्डरांना सवलती देतंय

दुसऱ्या एका ट्विटमध्ये केशव उपाध्ये यांनी राज्यात लागोपाठ झालेल्या आत्महत्या प्रकरणावरून ठाकरे सरकारवर टीका केली आहे. राज्यातील युवा, शेतकरी, कलाकार हे निराशेने आत्महत्याचा मार्गावर असताना उद्धव ठाकरे सरकार काय करतय तर बिल्डरांना सवलती देत आहे. चार घटना त्यात एकाच दिवशी ३ आत्महत्या १. प्रशासनाच्या अनास्थेमुळे लोहा नांदेड येथील दिव्यांग शेतकऱ्याची आत्महत्या. २. एमपीएसीतील विलंबामुळे स्वप्नील लोणकर आत्महत्या. ३. कला दिग्दर्शक राजेश साप्ते यांची आत्महत्या मात्र राज्य सरकारची प्राथमिकता काय तर, BDD चाळ प्रकल्प एकही वीट लावली नसताना बिल्डर्सना ५०० कोटी रूपये देण्याचा प्रस्ताव, असे टीकास्त्र उपाध्ये यांनी सोडले आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणMaratha Reservationमराठा आरक्षणPandharpur Wariपंढरपूर वारीBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरेState Governmentराज्य सरकार