Kerala assembly Election 2021: What is relation between RSS with smugglers? question of Kerala Chief Minister P. Vijayan to Amit Shah | Kerala assembly Election 2021 : RSS चा स्मगलरांशी काय संबंध? केरळच्या मुख्यमंत्र्यांच्या अमित शाहांना बोचरा सवाल 

Kerala assembly Election 2021 : RSS चा स्मगलरांशी काय संबंध? केरळच्या मुख्यमंत्र्यांच्या अमित शाहांना बोचरा सवाल 

ठळक मुद्देअमित शाहा यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केरळचा अपमान केलाअनेक एजन्सींनी भारतामध्ये केरळ हे सर्वात कमी भ्रष्ट असल्याचे प्रमाणित केले आहे काँग्रेसनेसुद्धा अमित शाहांच्या या विधानावर कुठल्याही प्रकारचा आक्षेप घेतला नाही, कारण हे दोघेही एकसारखेच आहेत

तिरुवनंतपुरम - केरळमधील सत्ताधारी डावे पक्ष आणि मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांची सरबत्ती करणारे गृहमंत्री अमित शाहा यांना केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन (P. Vijayan ) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. (Kerala assembly Election 2021) अमित शाहा (Amit Shah)यांनी सोने आणि डॉलर तस्करीच्या प्रकरणात केरळ सरकारला सात प्रश्न विचारले होते. त्याला प्रत्युत्तर देताना आता विजयन यांनी RSS चा स्मगलरांशी काय संबंध आहे, असा प्रतिप्रश्न अमित शाहांना विचारला आहे. (What is relation between RSS with smugglers? question of Kerala Chief Minister P. Vijayan to Amit Shah)

 केरळमधील सोने आणि डॉलरच्या तस्करीची लिंक ही केरळ सरकारशी जुळली असल्याचा आरोप अमित शाहा यांनी केला होता. तपास यंत्रणांचा हवाला देऊन शाहा यांनी हा आरोप केला होता. तस्करीतील आरोपींनी मुख्यमंत्री विजयन, विधानसभा अध्यक्ष पी. श्रीरामकृष्णन आणि अनेक मंत्र्यांविरोधात सनसनाटी आरोप केल्याचे कस्टम विभागाने हायकोर्टात सांगितल्याचा दावा अमित शाहा यांनी केला होता. 

अमित शाहांच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना केरळच्या मुख्यमंत्र्यांनी हे आरोप म्हणजे केरळचा अपमान असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, अमित शाहा यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केरळचा अपमान केला. केरळ ही भ्रष्टाचाराची भूमी असल्याचे ते म्हणाले. अनेक एजन्सींनी भारतामध्ये केरळ हे सर्वात कमी भ्रष्ट असल्याचे प्रमाणित केले आहे. मात्र काँग्रेसनेसुद्धा अमित शाहांच्या या विधानावर कुठल्याही प्रकारचा आक्षेप घेतला नाही, कारण हे दोघेही एकसारखेच आहेत. 

विजयन पुढे म्हणाले की, संघ परिवारामधील एक ज्ञात व्यक्ती डिप्लोमॅटिक बॅगेजमध्ये सोन्याची तस्करी करण्यामधील मुख्य सूत्रधार नाही आहे? तुम्हाला हे माहिती नाही आहे का? सीमा शुल्क पूर्णपणे सोन्याच्या तस्करीसारख्या देशविरोधी कृतीला रोखण्यासाठी जबाबदार नाही आहे. तिरुवनंतपुरम विमानतळ पूर्णपणे केंद्र सरकारच्या अधीन नाही आहे, अशी प्रश्नांची सरबत्तीच विजयन यांनी केली. 

भाजपा सत्तेवर आल्यानंतर तिरुवनंतपुरम विमानतळ सोन्याच्या तस्करीचे केंद्र कसे बनले? सोन्याची तस्करी सुलभपणे करण्यासाठी या विमानतळावरील विविध पदांवर संघ परिवारातील लोकांची जाणीवपूर्वक नियुक्ती नाही करण्यात आली नाही का? असा सावालही विजयन यांनी केला.  

Web Title: Kerala assembly Election 2021: What is relation between RSS with smugglers? question of Kerala Chief Minister P. Vijayan to Amit Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.