शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'सायकलवर फिरून कर्नाटकात भाजप उभी केली, तेव्हा कोणी नव्हतं'; भावूक होत येडियुरप्पा यांचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 13:37 IST

B S yediyurappa : कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा. राजीनामा देताना येडियुरप्पा झाले भावूक.

ठळक मुद्दे कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा.राजीनामा देताना येडियुरप्पा झाले भावूक.

कर्नाटकात भाजपचा मोठा चेहरा म्हणून ओळखले जाणारे आणि कर्नाटकचेमुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी सोमवारी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. यानंतर मोठ्या कालावधीपासून कर्नाटकात सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर पडदा पडला. राजीनामा देण्य़ापूर्वी एका कार्यक्रमात त्यांनी राजीनामा देणार असल्याची घोषणा केली होती. महत्त्वाची बाब म्हणजे आजच त्यांच्या सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. कर्नाटकचे राज्यपाल थावर चंद गेहलोत यांनी येडियुरप्पा यांचा राजीनामा स्वीकारला असून पुढील मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी होत नाही तोवर काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करण्यास सांगितलं आहे.

विधानसभेत यादरम्यान येडियुरप्पा हे भावूक झाले. तसंच या दोन वर्षांच्या कार्यकाळात आपली सातत्यानं परीक्षा झाली असल्याचं म्हटलं. "ज्यावेळी अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते, तेव्हा मला त्यांनी केंद्रात मंत्री बनण्यास सांगितलं होतं. परंतु मी त्यांना नकार दिला आणि कर्नाटकातच राहणार असल्याचं म्हटलं होतं," असं येडियुरप्पा म्हणाले.  "मी आपल्या राजकीय जीवनात कायमच अग्निपरीक्षा दिली आहे. जेव्हा कार नव्हत्या तेव्हा मला आठवतंय की मी दिवसभर सायकल चालवून पक्षासाठी काम करत होते. शिमोगाच्या शिकारीपुरामध्ये ठराविकच कार्यकर्त्यांसोबत मी भाजप पक्ष उभा केला. तेव्हा कोणीही नव्हतं. पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन व्हावं अशी माझी इच्छा होती, ती पूर्ण झाली," असंही त्यांनी नमूद केलं. 

यापूर्वी ट्वीटद्वारे संकेतबुधवारी बीएस येडियुरप्पांनी ट्वीट करत आपल्या राजीनाम्याचे संकेत दिले होते. "भाजपाचा इमानदार कार्यकर्ता असल्याचा मला अभिमान आहे. मी उच्च विचारांचे अनुसरण करून पक्षाची सेवा केली हे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. मी माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याला आवाहन करतो की, त्यांनी पक्षाच्या आदर्शांचे पालन करावं," असं ते म्हणाले होते.

टॅग्स :B. S. Yeddyurappaबी. एस. येडियुरप्पाKarnatakकर्नाटकChief Ministerमुख्यमंत्रीBJPभाजपाPoliticsराजकारणTwitterट्विटर