मुंबई: शिवसेना आणि अभिनेत्री कंगना राणौत यांच्यातील वाद सुरूच आहे. कंगनाचा विषय आमच्यासाठी संपला असं शिवसेना खासदार संजय राऊत स्पष्ट केलं आहे. मात्र कंगनाचे शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरील हल्ले सुरूच आहेत. आज मुंबई सोडून चंदिगढला रवाना झालेल्या कंगनानं पुन्हा एकदा थेट मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे. मुंबईतून जाता जाता कंगना राणौतची शेरोशायरी; PoKवरून हटेना, टार्गेट शिवसेना!कंगनानं ट्विटरवरून मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली आहे. तिनं ट्विटमध्ये पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंच्या नावाचाही उल्लेख केला आहे. 'मी मुव्ही माफिया, सुशांतचे मारेकरी आणि ड्रग रॅकेटला उघडं पाडतेय, हीच गोष्ट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसाठी त्रासदायक ठरतेय. मुख्यमंत्र्यांचे लाडके पुत्र आदित्य ठाकरे ज्यांच्यासोबत फिरतात, त्यांना मी उघडं पाडतेय, हीच त्यांची समस्या आहे. हाच माझा सर्वात मोठा गुन्हा आहे,' असं ट्विट कंगनानं केलं आहे.
हाच माझा सर्वात मोठा गुन्हा; घरी परतलेल्या कंगनाचा पुन्हा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2020 17:12 IST