शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

ढासळलेल्या अर्थव्यवस्थेवरून लक्ष विचलित करण्यासाठीच कंगना प्रकरण- अमोल कोल्हे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2020 14:52 IST

Dr Amol Kolhe Dig Comments on Kangana Ranaut : कोणाला किती महत्त्व द्यायचं ते आपण ठरवायचं; कोल्हेंचा कंगनावर निशाणा

मुंबई: शिवसेना Shivsena आणि अभिनेत्री कंगना Kangana Ranaut राणौत यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. मुंबई महापालिकेनं  BMC पाली हिल येथील कार्यालयावर कारवाई केल्यानंतर कंगना अतिशय आक्रमक झाली आहे. आता तिनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत हल्लाबोल सुरू केला आहे. या प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हेंनी भाष्य केलं आहे. कंगनाचा बोलविता धनी कोण आहे, याची सुज्ञ जनतेला कल्पना असल्याचं कोल्हे म्हणाले. कोणाला किती महत्त्व द्यायचं हे आपण ठरवायला हवं, असं मत त्यांनी व्यक्त केलं.“शिवसेना मंत्र्यांचं मुंबईमधील कार्यालय अनधिकृत; १ वर्षापूर्वी नोटीस बजावूनही कारवाई नाही”कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेवरून लक्ष विचलित करण्यासाठी हा संपूर्ण प्रकार सुरू आहे. लाखो तरुणांचे रोजगार गेले आहेत. अनेकांच्या हाती नोकऱ्या नाहीत. जीडीपीमध्ये ऐतिहासिक घसरण झाली आहे. एका बाजूला अर्थव्यवस्था संकटात असताना दुसऱ्या बाजूला दर दिवशी कोरोनाचे जवळपास ९० हजार रुग्ण सापडत आहेत. आरोग्य व्यवस्था तोकडी पडू लागली आहे. यावरून लक्ष विचलित करण्यासाठीच कंगनाला नाहक महत्त्व दिलं जातं असल्याचं कोल्हे म्हणाले.बीएमसी नोटिशीच्या वादात कंगनानं शरद पवारांना ओढलं; जितेंद्र आव्हाडांनीही दिलं प्रत्युत्तरयावेळी अमोल कोल्हेंनी Dr Amol Kolhe  एक कलाकार म्हणूनही कंगनाच्या विधानांवर भाष्य केलं. 'कलाकारांना सामाजिक भान असायला हवं. त्यांनी सामाजिक बांधिलकी जपायला हवी. मुंबई पोलिसांमुळे आज शहर सुरक्षित आहे. जेव्हा शहरात पाणी तुंबतं, तेव्हा आपले पोलीस बांधवच रस्त्यावर असतात. आता कोरोना काळातही तेच रस्त्यावर आहेत. अनेक पोलिसांनी कोरोनाविरुद्धच्या लढ्यात जीव गमावला आहे. त्यावेळी कंगना काहीच बोलली नाही. त्यामुळेच तिला आणि तिच्या विधानांना किती महत्त्व द्यायचं, याचा विचार आपण करायला हवा,' असं कोल्हे म्हणाले. माझ्या शत्रूमध्ये समोरून वार करण्याची हिंमत नाही, कंगना राणौतचा शिवसेनेवर पुन्हा वारकंगनाचा शिवसेनेवर पुन्हा निशाणाज्या विचारधारेवर बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली, आज ते सत्तेसाठी ती विचारधारा विकून शिवसेना ते सोनिया सेना बनली आहे, ज्या गुंडांनी माझ्यामागे माझं घर तोडलं त्यांना सिविक बॉडी म्हणू नका, संविधानाचा इतका मोठा अपमान करु नका अशा शब्दात कंगना राणौतनं शिवसेनेवर आरोप केला आहे.कंगना राणौतनं ट्विट करुन सांगितलं आहे की, तुमच्या वडिलांचं चांगलं कार्य तुम्हाला पैसा देऊ शकतात पण सन्मान स्वत:ला कमवायला लागतो. माझं तोंड बंद कराल पण माझा आवाज लाखो लोकांपर्यंत पोहचेल. किती जणांची तोंडे बंद करणार? किती आवाज दाबणार? कधीपर्यंत सत्यापासून पळत राहणार तुम्ही काहीच नाही फक्त घराणेशाहीचं उदाहरण आहात अशी घणाघाती टीका कंगनानं केली आहे.त्याचसोबत निवडणुकीत हरल्यानंतर निर्लज्जपणे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करत शिवसेनेचं सोनिया सेनेत रुपांतर केले असंही कंगनानं म्हटलं आहे.कंगना राणौत आणि शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या वादात बुधवारी बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर रात्री कंगनाने ट्वीट करून पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला. रात्री केलेल्या ट्विटमध्ये कंगना म्हणाली की, मी आता आपल्या मुंबईत आहे. आपल्या घरात आहे. माझ्यावर वारसुद्धा करण्यात आला, पण तो मी विमानात असताना मागून करण्यात आला. मला समोरून नोटिस देण्याची किंवा समोरून वार करण्याची हिंमत माझ्या शत्रूमध्ये नाही. माझ्या कार्यालयाच्या करण्यात आलेल्या नुकसानामुळे अनेक लोक दु:खी आणि चिंतित आहेत. मी त्यांचे आशीर्वाद आणि प्रेमासाठी ऋणी आहे असं कंगनानं म्हटलं होतं.ही तर महाराष्ट्रात सरकार पुरस्कृत दहशत - देवेंद्र फडणवीस

अभिनेत्री कंगना रनौत हिच्या घराचे बांधकाम ज्या पद्धतीने पाडण्यात आले त्यावरून राज्यात सरकार पुरस्कृत दहशत सुरू असल्याचे दिसते, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात इतके घाबरट आणि लोकशाहीविरोधी सरकार यापूर्वी कधीही बघितलेले नाही. आपल्या विचारांचा विरोध करणाऱ्या व्यक्ती, पत्रकार या सर्वांना दाबण्याचे काम या सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. ज्या प्रकारे एखाद्या वक्तव्याने मुंबई, महाराष्ट्राचा अवमान होतो त्याचे समर्थन करता येत नाही; पण सरकारच्या अशा दहशतीचेही समर्थन करता येणार नाही. या कृतीमुळे देशात महाराष्ट्राची बदनामी झाली आहे असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

यांना उघडे पाडल्याशिवाय राहणार नाही

बॉलीवूड माफिया आणि उद्धव ठाकरे यांच्यातील थेट संबंधच आजच्या प्रकरणाने उघड झाले आहेत. या कंपूने माझे घर आणि मलाही मारून टाकले, तरी यांना उघडे पाडल्याशिवाय राहणार नाही. अचानक माझे कार्यालय अनधिकृत बनले, २४ तासांत ते तोडले गेले. आता माझे घर पाडण्याची धमकी दिली जात आहे. बॉलीवूड माफियांचे लाडके असणारे, जगातले भारी मुख्यमंत्री म्हणून मिरविणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचे अंदाज यानिमित्ताने खरे ठरले, असे कंगनाने म्हटले आहे.

कार्यालयानंतर कंगनाच्या फ्लॅटवर बीएमसीची नजर

मुंबई महापालिकेने दिवाणी न्यायालयाकडे कंगना रणौतचे खारमधील घरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची परवानगी मागितली आहे. पालिकेचे म्हणणे आहे की कंगनाच्या फ्लॅटमध्ये आठ ठिकाणी अवैध बांधकाम करण्यात आले आहे. मुंबईतील खार रोड पश्चिम भागात 16 व्या रोडवर डिब्रीझ अपार्टमेंटमध्ये सातव्या मजल्यावर कंगनाचा फ्लॅट आहे. या फ्लॅटमध्ये एफएसआयचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेने २०१८ मध्ये कंगनाला एमआरटीपी नोटीस दिली होती. मुंबई महापालिकेच्या एमआरटीपी नोटीस विरोधात तिने दिंडोशी न्यायालयात दाद मागितली होती. त्यावेळी कोर्टाने कंगनाची बाजू ऐकून घेत पुढील कारवाईस स्टे दिला होता, तर पालिकेला यावर सविस्तर बाजू मांडण्यास सांगितले होते.

कंगनाची जीभ घसरली

महापालिकेने केलेल्या पाडकामाच्या कारवाईमुळे संतप्त झालेल्या कंगना रनौतने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करीत, ‘आज माझे घर तुटले, उद्या तुमचा अहंकार तुटेल. हा काळाचा महिमा आहे, तो बदलत असतो,’ असे म्हणत बॉलीवूड माफिया आणि उद्धव ठाकरे यांचे गुळपीठ यानिमित्ताने उघड झाल्याचा आरोपही केला.

माझ्यापुरता विषय संपला - संजय राऊत

कंगनाप्रकरणी बुधवारी दुपारपर्यंत मौन बाळगणाऱ्या संजय राऊत यांनी त्यानंतर माध्यमांशी बोलताना, ‘मी कधीच कंगनाला धमकावले नव्हते. मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हटल्याबद्दलचा माझा राग मी व्यक्त केला होता. आज पालिकेने जी कारवाई केली त्याच्याशी माझा संबंध नाही. माझ्यापुरता हा विषय संपला आहे. मुंबईत कंगनाचे स्वागत आहे, ती येथे राहायला मोकळी आहे,’ असे राऊत स्पष्ट केले. याबाबतची पोस्टही त्यांनी ट्विटरवर शेअर केली.

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हे