शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

'थोबाडीत मारली असती हा कॉमन संवाद; नारायण राणेंचं वाक्य चुकीचं नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 15:08 IST

Narayan Rane vs Shivsena: 'एखादी गोष्ट चुकली तर राणेंना सांगण्यासाठी इतर पर्याय होते'

पुणे: काल(दि.24) महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी त्यांना जामीन मिळाला, पण या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले. राज्यातील अनेक ठिकाणी शिवसेना आणि भाजपाचे कार्यकर्ते आमने-सामन आलेले पाहायला मिळाले. काही ठिकाणी हिंसक आंदोलनही झाली. दरम्यान, या सर्व प्रकरणावर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

...हा कॉमन संवादपुण्यात बोलत असताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावर आपली प्रतिक्रिया देताना नारायण राणेंचं काही चुकलं नसल्याचं मत व्यक्त केलं आहे. 'केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं वाक्य चुकलं नाही. थोबाडीत मारली असती हा कॉमन संवाद आहे. एखादी गोष्ट चुकली तर राणेंना सांगण्यासाठी इतर पर्याय होते, असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं.  

सत्याचा विजय झालातसेच, काल दिवसभर झालेली कारवाई सूडबुद्धीनं झालीय, हे सिद्ध झालं.  आता राणेंना मोकळीक दिली, जामीन दिला. एसपीकडे दोनदा हजेरी लावण्यास सांगितलं. त्यांना नोटीस दिली आणि बोलताना सांभाळून बोललं पाहिजे असंही सांगितलं. पण, अखेर सत्याचाच विजय झाला. राज्य सरकार सारखं कोर्टाच्या थपडा खात आहे, अशी टीकाही चंद्रकांत पाटलांनी केली.

मुंबईत पोपटाचा प्राणते पुढं म्हणाले, राणेंना मुंबईत चांगला प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे आता आगामी महापालिका निवडणुकीत मुंबई हरली तर...? असा प्रश्न त्यांच्या मनात आहे. या मुंबईतच पोपटाचा प्राण आहे, असा टोला त्यांनी यावेळी लगावला. तसेच, कायदा सुव्यवस्था प्रश्न बरा आमच्या वेळीच निर्माण होतो. पोलिसांच्या बळावर आणि गुंडांच्या बळावर हे राज्य चाललंय, असा आरोपही केला. याशिवाय, राणेंची तब्येत खराब असताना जेवणाच्या ताटावरुन त्यांना उठवणं अमानवीय असल्याचंही ते म्हणाले. 

टॅग्स :Politicsराजकारणchandrakant patilचंद्रकांत पाटीलNarayan Raneनारायण राणे BJPभाजपाShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेAnil Parabअनिल परबNitesh Raneनीतेश राणे Nilesh Raneनिलेश राणे Varun Sardesaiवरुण सरदेसाई