शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

Param bir Singh Letter Bomb: गृहमंत्र्यांची चौकशी तुम्हीच करा; ज्युलिओ रिबेरोंचा शरद पवारांच्या प्रस्तावास स्पष्ट नकार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 10:33 IST

Julio Ribeiro answer to Sharad pawar: राज्याचा राजकारणात शनिवारी रात्री भूकंप आला होता. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंगांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप असलेले पत्र मुख्यमंत्री कार्यालयाला पाठविले होते. यामध्ये निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याला देशमुखांनी मुंबईतील पब, बार आदी आस्थापनांकडून महिन्याला 100 कोटी रुपये वसुलीचे काम दिले होते. गृहमंत्री पोलिसांवर दबाव टाकत असल्याचे परमबीर यांनी मुख्यमंत्री, शरद पवार, अजित पवारांना सांगितले होते, असा आरोप केला होता. 

बॉलिवूडचा अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आत्महत्येप्रकरणात होत असलेले राजकारण हे राज्यातील सरकार पाडण्यासाठी होत असल्याचा आरोप करणाऱे माजी पोलिस महासंचालक ज्युलिओ रिबेरो (Julio Ribeiro) यांनी परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बचा (Param Bir Singh letter bomb) तपास करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. ऱाष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांनी अनिल देशमुखांवरील (Anil deshmukh) परमबीर सिंगांनी लावलेल्या आरोपांचा ज्युलिओ रिबेरोंसारख्या अधिकाऱ्याकडून तपास व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली होती. यावर रिबेरो यांनी इच्छुक नसल्याचे म्हटले आहे. ("I am 92 years old. Nobody goes around doing this work at the age of 92. If the inquiry is against the home minister of Maharashtra, then Mr Pawar should make it because he is the head of the (ruling) party," Ribeiro said.)

Parambir Singh: 'जिलेटीनपेक्षा 100 कोटींची चिठ्ठी अधिक स्फोटक'; कोणत्याही क्षणी केंद्राची महाशक्ती ED ची एन्ट्री शक्य

राज्याचा राजकारणात शनिवारी रात्री भूकंप आला होता. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंगांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप असलेले पत्र मुख्यमंत्री कार्यालयाला पाठविले होते. यामध्ये निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याला देशमुखांनी मुंबईतील पब, बार आदी आस्थापनांकडून महिन्याला 100 कोटी रुपये वसुलीचे काम दिले होते. गृहमंत्री पोलिसांवर दबाव टाकत असल्याचे परमबीर यांनी मुख्यमंत्री, शरद पवार, अजित पवारांना सांगितले होते, असा आरोप केला होता. यानंतर भाजपाने हे प्रकरण उचलून धरत अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी करत चौकशीची मागणी केली होती. यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीदेखील एका पोलीस एपीआयला एवढे तर राज्यात असे किती आयुक्त आहेत, त्यांना किती सांगितलेले हा आकडादेखील बाहेर यायला हवा अशी मागणी केली होती. या साऱ्य़ावर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत परमबीर सिंगांचे आरोप गंभीर आहेत, परंतू पुरावे दिलेले नाहीत. यामुळे या प्रकरणाची ज्युलिओ रिबेरोंसारख्या अधिकाऱ्याकडून चौकशी करण्याचा प्रस्ताव त्यांनी दिला होता. 

Sachin Vaze: सचिन वाझेंचे आयुष्यच रहस्यमय! स्वत:चे मेसेंजिंग अ‍ॅप, मराठी फेसबुक ते रितेश-जेनेलियावर खटला...

यावर रिबेरो यांनी आपण उपलब्ध नसल्याचे उत्तर दिले आहे. मला सरकारने संपर्क केलेला नाहीय. कोणत्याही प्रकरणाच्या चौकशीसाठी जरी त्यांनी माझ्याशी संपर्क साधला तरीदेखील मी उपलब्ध नसेन, अशा शब्दांत रिबेरो यांनी पवारांचा प्रस्ताव फेटाळला आहे.मी आता 92 वर्षांचा आहे. या वयात कोणीही अशा प्रकरणाचा तपास करू शकणार नाही. जर महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांची चौकशी लागली तर ती सत्ताधारी पक्षाचे प्रमुख म्हणून शरद पवारांनीच करावी, असे रिबेरो यांनी सांगितले. या प्रकरणाची चौकशी निवृत्त पोलीस अधिकाऱ्यालाच का करायला सांगताहेत, असा सवालही रिबेरो यांनी उपस्थित केला. 

Parambir Singh: परमबीर सिंगांच्या 100 कोटींच्या लेटर बॉम्बमागे कोण? सोशल मीडियाच्या तोंडी एकच नाव

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAnil Deshmukhअनिल देशमुखNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाParam Bir Singhपरम बीर सिंगsachin Vazeसचिन वाझे