Parambir Singh: परमबीर सिंगांच्या 100 कोटींच्या लेटर बॉम्बमागे कोण? सोशल मीडियाच्या तोंडी एकच नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 03:32 PM2021-03-21T15:32:04+5:302021-03-21T15:36:12+5:30

Anil deshmukh 100 crore allegation in Sachin Vaze Case: दोन दिवसांपूर्वी मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची सचिन वाझे प्रकरणात उचलबांगडी करण्यात आली होती. यानंतर लोकमतच्या एका कार्यक्रमात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी परमबीर सिंगांची बदली अक्ष्यम्य चुकांमुळे करण्यात आल्याचे सांगत ही बदली नसून कारवाई असल्याचे स्पष्ट केले होते.

Who is behind Parambir Singh's 100 crore letter bomb? Sharad Pawar trending on social media | Parambir Singh: परमबीर सिंगांच्या 100 कोटींच्या लेटर बॉम्बमागे कोण? सोशल मीडियाच्या तोंडी एकच नाव

Parambir Singh: परमबीर सिंगांच्या 100 कोटींच्या लेटर बॉम्बमागे कोण? सोशल मीडियाच्या तोंडी एकच नाव

googlenewsNext

महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) दिल्लीवारीवरून परतले आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंगांनी (Parambir Singh) 100 कोटींच्या वसुलीचा लेटर बॉम्ब फोडला असा दावा खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला आहे. मात्र, सोशल मीडियावर एकच चर्चा आहे. परमबीर सिंगांच्या 100 कोटींच्या लेटर बॉम्बमागे कोण? असा प्रश्न विचारला जात असून यावर एकच नाव सकाळपासून ट्रेंड होऊ लागले आहे. (Who is behind Parambir Singh's 100 crore letter sent to CM Uddhav thackreay. allegation on Anil Deshmukh Sachin Vaze Case.)

Parambir Singh: 'जिलेटीनपेक्षा 100 कोटींची चिठ्ठी अधिक स्फोटक'; कोणत्याही क्षणी केंद्राची महाशक्ती ED ची एन्ट्री शक्य


दोन दिवसांपूर्वी मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची सचिन वाझे (Sachi Vaze) प्रकरणात उचलबांगडी करण्यात आली होती. यानंतर लोकमतच्या एका कार्यक्रमात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी परमबीर सिंगांची बदली अक्ष्यम्य चुकांमुळे करण्यात आल्याचे सांगत ही बदली नसून कारवाई असल्याचे स्पष्ट केले होते. यावरून दुखावल्या गेलेल्या परमबीर सिंगांनी शनिवारी रात्री मुख्यमंत्री कार्यालयावर लेटर बॉम्ब टाकून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. या प्रकरणाची दखल आता केंद्र सरकारनेही घेतली आहे. 

Sachin Vaze: सचिन वाझेंचे आयुष्यच रहस्यमय! स्वत:चे मेसेंजिंग अ‍ॅप, मराठी फेसबुक ते रितेश-जेनेलियावर खटला...


केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार गप्प का आहेत असा सवाल विचारला आहे. तसेच विरोधी पक्षनेत्यांनी देखील राळ उठविली आहे. या साऱ्या गदारोळात शरद पवारांनीदेखील नुकतीच पत्रकार परिषद घेत परमबीर सिंगांनी केवळ आरोप केलेत, पुरावे दिले नसल्याचे म्हटले आहे. आता या 100 कोटींच्या सचिन वाझेंना दिलेल्या वसुली मोहिमेवर सोशल मीडियात चर्चा रंगू लागली आहे. 


परमबीर सिंगांच्या या पत्रामागे कोण आहे?
गेल्या काही दिवसांपासून एकतर पोलीस आयुक्त किंवा गृहमंत्र्यांची विकेट जाणार असल्याचे बोलले जात होते. परंतू पोलीस आयुक्तांची विकेट पडली होती. शरद पवार देशमुखांवर नाराज असल्याचीही चर्चा होती. यामुळे परमबीर यांनी पाठविलेल्या पत्रामागे कोण असा सवाल विचारला जात आहे. यावर नेटकऱ्यांनी थेट शरद पवारांचेच नाव घेतले आहे. या प्रश्नावर शरद पवारांचे नाव ट्रेंड होऊ लागले आहे. 


पुढील आठवड्यात पवार पंतप्रधान होणार...
एका युजरने तर शरद पवार पुढील आठवड्यात महाराष्ट्राचे पंतप्रधान बनतील अशी भविष्यवाणीच करून टाकली आहे. मनी बिलवरून भाजपाच्या विरोधात 200 खासदार आहेत. हे बिल पास करण्यासाठी ते समर्थन देणार नाहीत. असे म्हटले आहे. 


 

Web Title: Who is behind Parambir Singh's 100 crore letter bomb? Sharad Pawar trending on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.