शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मोठी घडामोड! काँग्रेसमधील अंतर्गत वादाचा भडका?; बाळासाहेब थोरात, नितीन राऊत पोहोचले दिल्लीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 13:01 IST

विधानसभा अध्यक्ष हे पद महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला आले होते. परंतु नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर पुन्हा एकदा या पदावरून महाविकास आघाडीत पेच निर्माण झाला होता.

ठळक मुद्देविधानसभा अध्यक्षपदावरून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवलं होतंअधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात येईल अशी चर्चा सुरू झाली होती. ५ जुलै रोजी विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेस उमेदवाराची घोषणा केली जाईल असं प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सांगितले होते.

नवी दिल्ली – विधानसभा अध्यक्षपदावरून काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद असल्याचं उघड झालं आहे. महाविकास आघाडी सरकारची स्थापना झाल्यानंतर नाना पटोले यांना विधानसभा अध्यक्षपद देण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर काही काळातच नाना पटोले(Nana Patole) यांच्यावर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेव्हापासून आतापर्यंत हे पद रिक्त आहे.

विधानसभा अध्यक्ष हे पद महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला आले होते. परंतु नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर पुन्हा एकदा या पदावरून महाविकास आघाडीत पेच निर्माण झाला होता. विधानसभा अध्यक्षपदावरून महाविकास आघाडीत चर्चा होईल मग निर्णय होईल असं राष्ट्रवादी-शिवसेना(NCP-Shivsena) म्हणत होती. तर हे पद काँग्रेसकडेच राहणार असल्याचा दावा काँग्रेसचे नेते करत आहेत. परंतु अद्याप विधानसभा अध्यक्षपदाबाबत संभ्रम आहे. 

त्यातच आता काँग्रेस(Congress) विधानसभा अध्यक्षपदावरून पक्षात मतभेद झाल्याचं कळतंय. यासाठी ज्येष्ठ मंत्री बाळासाहेब थोरात(Balasaheb Thorat) आणि मंत्री नितीन राऊत(Nitin Raut) दिल्लीत दाखल झाले आहेत. विधानसभा अध्यक्षपद अद्यापही काँग्रेसला मिळालं नाही. या अधिवेशनातही विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांमध्ये नाराजी आहे. यासाठी थोरात, राऊत हे दिल्लीत काँग्रेस हायकमांड आणि राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत.त्याचसोबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचीही भेट घेणार आहेत.

नाना पटोलेंनी केली होती घोषणा

विधानसभा अध्यक्षपदावरून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवलं होतं. त्यानंतर अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात येईल अशी चर्चा सुरू झाली होती. महाविकास आघाडीत सुसंवाद आहे. सत्तेतील व्य़क्तींची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसच्या वाट्याला गेले आहे. त्यामुळे पुढचा अध्यक्ष त्यांचाच असेल. महाविकास आघाडीचाच उमेदवार विजयी होईल. विरोधकांनी ही निवडणूक नाही लढविली तर महाराष्ट्रावर उपकार होतील असं शिवसेना नेते संजय राऊतांनी म्हटलं होतं. तर ५ जुलै रोजी विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेस उमेदवाराची घोषणा केली जाईल असं प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सांगितले होते. मात्र या विधिमंडळ अधिवेशनातही अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली नाही.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातNitin Rautनितीन राऊतcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेनाvidhan sabhaविधानसभा