शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

'काँग्रेसनं लोकसभा निवडणूक जिंकल्यास पाकिस्तानात दिवाळी साजरी होईल'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 1:27 PM

काँग्रेस जिंकल्यास पाकिस्तानमध्ये आनंद साजरा होईल; भाजपा मुख्यमंत्र्याचं अजब विधान

अहमदाबाद: लोकसभा निवडणुकीत चुकून काँग्रेसला यश मिळाल्यास पाकिस्तानात दिवाळी साजरी होईल, असं विधान गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी केलं आहे. 'येत्या निवडणुकीत असं काही घडणार नाही. पण 23 मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि त्यात चुकून काँग्रेसचा विजय झाला, तर पाकिस्तानात आनंद साजरा होईल. कारण ते (काँग्रेस) त्यांच्याशी संबंधित आहेत,' असं रुपानी यांनी मेहसाण्यात भाजपाच्या विजय संकल्प रॅलीला सुरुवात करताना म्हटलं. देशातील जनता मोदींच्या पाठीमागे उभी राहील आणि 23 मे रोजी जाहीर होणाऱ्या निकालात त्यांनाच विजयी करेल, असा विश्वास गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी बालाकोटमध्ये करण्यात आलेल्या एअर स्ट्राइकचे पुरावे मागणारे काँग्रेस नेते सॅम पित्रोडा यांच्यावर शरसंधान साधलं. 'पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देतो, ही बाब संपूर्ण जगाला माहीत आहे. मात्र पाच-सात जणांच्या कृत्यासाठी पाकिस्तानला दोषी धरणं चुकीचं असल्याचं राहुल गांधींचे शिक्षक असलेल्या पित्रोडांना वाटतं. काँग्रेस नेते पाकिस्तानची भाषा बोलत आहेत,' अशी टीका रुपानी यांनी केली. विरोधक सुरक्षा दलांचा अपमान करत असल्याचा आरोप त्यांनी केला. सुरक्षा दलांच्या प्रमुखांची विधानं खोटी ठरवून तुम्ही नेमकं कोणाचं समर्थन करत आहात?, असा प्रश्न रुपानी यांनी विचारला. जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरची सुटका एनडीए सरकारनंच केली होती, या राहुल गांधींच्या विधानावरदेखील त्यांनी भाष्य केलं. काँग्रेसनं त्यांच्या सत्ताकाळात अनेक दहशतवाद्यांची सुटका केल्याचं ते म्हणाले. काँग्रेसनं मतपेढीचं राजकरण करत फुटीरतावाद्यांना प्रोत्साहन दिल्याचा आरोप त्यांनी केला.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मदVijay Rupaniविजय रूपाणीGujaratगुजरात