शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

काँग्रेस सत्तेत आल्यास काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा आणू; दिग्विजय सिंहांच्या कथित क्लिपवरून भाजप आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 8:02 PM

Digvijay Singh Club House Chat : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंहांवर भाजपनं साधला निशाणा. क्लब हाऊस चॅटच्या कथित व्हायरल ऑडियोवरून भाजप आक्रमक.

ठळक मुद्देकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंहांवर भाजपनं साधला निशाणा. क्लब हाऊस चॅटच्या कथित व्हायरल ऑडियोवरून भाजप आक्रमक.

काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह (Digvijay Singh) यांच्यावर भाजपनं जोरदार निशाणा साधला आहे. दिग्विजय सिंह यांच्या क्लब हाऊस चॅटच्या कथित व्हायरल ऑडियो क्लिपवरून (Digvijay Singh Club House Chat Audio) भाजप आक्रमक झाली आहे. काँग्रेस पुन्हा सत्तेत आल्यास जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा बहाल करण्यात येईल असा दावा या ऑडिओ क्लिपमध्ये करण्यात आला आहे. "दिग्विजय सिंह हे पाकिस्तानप्रमाणे बोवलत आहेत. यावर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी उत्तर दिलं पाहिजे," असं दिग्विजय सिंह म्हणाले."हे तेच दिग्विजय सिंह आहेत ज्यांनी पुलवामा एक अपघात असल्याचं म्हटलं होतं आणि २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला आरएसएसचा कट म्हटलं होतं. हे सर्व त्या टुलकिटचा भाग आहे, ज्यामध्ये भारताची बदनामी करण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हटवण्यासाठी कट रचला जात आहे. दिग्विजय सिंह यांचं हे वक्तव्य असं दाखवून देतंय की पाकिस्तानसोबत काँग्रेसचे काही संबंध आहे. काश्मीरमध्ये असलेली शांतता आणि त्या ठिकाणच्या लोकांचं उत्तम होत असलेलं जीवन बिघडवण्याचा हा एक प्रयत्न आहे," असं सिंह म्हणाले."संसदेत काँग्रेसच्या अधीर रंजन चौधरी यांनी काश्मीर हा द्विपक्षीय मुद्दा असल्याचं म्हटलं होतं. तसंच यावर संसदेत चर्चा केली जाऊ शकत नसल्याचं सांगितलं. चौधरी यांना सोनिया गांधी यांचं समर्थ होतं आणि संपूर्ण जगानं काँग्रेसची भूमिका काय होती हे पाहिलं. मणिशंकर अय्यर यांनी मोदींना हटवण्यासही सांगितलं. या सर्वांचं नेतृत्व राहुल गांधीच करत आहेत. जेव्हा राहुल गांधी यांनी काश्मीरमध्ये हजारो जाणांच्या मृत्यूबद्दल लिहिलं तेव्हा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान काश्मीरमध्ये काय घडतंय हे पाहा असं सांगण्यासाठी थेट संयुक्त राष्ट्रांत पोहोचले," असंही त्यांनी नमूद केलं.काँग्रेस आणि पाकिस्तानमध्ये काही संबंध आहे आणि सर्वजण या टुलकिटचा भाग आहे. दिग्विजय सिंह यांच्यावर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी भाजपची मागणी असल्याचंही पात्रा म्हणाले.  

टॅग्स :Digvijaya Singhदिग्विजय सिंहcongressकाँग्रेसBJPभाजपाJammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खानSambit Patraसंबित पात्रा