शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

बिहारमध्ये भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्यास मुख्यमंत्री कोण होणार? अमित शाहांनी स्पष्टच सांगितलं

By बाळकृष्ण परब | Published: October 17, 2020 9:34 PM

Bihar Assembly Election 2020 News : बिहारमध्ये सध्या भाजपा आणि जेडीयू यांची आघाडी असली आणि ही निवडणूक नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात येत असली तरी निवडणुकीच्या निकालांनंतर नेमकी काय समिकरणे तयार होतील, याचा अंदाज घेतला जात आहे.

ठळक मुद्देबिहार निवडणुकीनंतरच्या परिस्थितीतीबाबत ज्या काही अफवा पसरवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यावर मी पूर्णविराम लावू इच्छितोनितीश कुमार हेच बिहारचे पुढचे मुख्यमंत्री असतील.नितीश कुमार हे आमचे जुने सहकारी आहेत. त्यामुळे आघाडी मोडण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही

नवी दिल्ली - बिहार विधानसभेची निवडणूक कोण जिंकणार यापेक्षा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण बनणार याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात केली जात आहे. बिहारमध्ये सध्या भाजपा आणि जेडीयू यांची आघाडी असली आणि ही निवडणूक नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात येत असली तरी निवडणुकीच्या निकालांनंतर नेमकी काय समिकरणे तयार होतील, याचा अंदाज घेतला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या तर मुख्यमंत्री कोण होणार हे, स्पष्टच सांगून टाकले आहे.बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वीच भाजपा आणि जेडीयूमध्ये मतभेद निर्माण झाल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर अमित शाहा यांनी न्यूज १८ नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत सर्व चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. अमित शाहा म्हणाले की, निवडणुकीनंतरच्या परिस्थितीतीबाबत ज्या काही अफवा पसरवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यावर मी पूर्णविराम लावू इच्छितो. नितीश कुमार हेच बिहारचे पुढचे मुख्यमंत्री असतील. देशाबरोबरच बिहारमध्येसुद्धा मोदी लाट आहे. त्यामुळे आघाडीच्या सहकाऱ्यांना समानपणे मदत मिळेल. नितीश कुमार हे आमचे जुने सहकारी आहेत. त्यामुळे आघाडी मोडण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही.अमित शाह यांनी पुढे सांगितले की, बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाला जेडीयूपेक्षा अधिक जागा मिळाल्या तरी नितीश कुमार हेच मुख्यमंत्री बनतील. अमित शाहा यांच्या या विधानामुळे बिहारमध्ये निवडणुकीनंतर नवी समिकरणे उदयास येण्याच्या चर्चेस पूर्णविराम मिळणार आहे.दरम्यान, या मुलाखतीत तनिष्कच्या वादग्रस्त जाहीरातीबाबतही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रथमक प्रतिक्रिया दिली आहे. अमित शाह म्हणाले की, भारतात सामाजिक समरसतेची पाळेमुळे भक्कम आहेत. त्यावर असे हल्ले करण्याचे प्रयत्न अनेकदा झाले. इंग्रजानींसुद्धा हा सद्भाव तोडण्याचा प्रयत्न केला. पुढे काँग्रेसनेसुद्धा तसाच प्रयत्न केला, असे अमित शाह म्हणाले. यावेळी अमित शाह यांनी ओव्हरअ‍ॅक्टिव्हिझमविरोधात इशारासुद्धा दिला. ते म्हणाले की, मला वाटते की, अतिसक्रियतेचे कुठलेही रूप असता कामा नये.बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी तीन टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. २८ ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबर रोजी बिहारमध्ये मतदान होणार आहे, तर १० नोव्हेंबर २०२० रोजी मतमोजणी होईल. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडीमध्ये चुरशीची लढाई अपेक्षित आहे.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकAmit Shahअमित शहाBJPभाजपाNitish Kumarनितीश कुमार