शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
4
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
7
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
10
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
11
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
12
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
13
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
14
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
15
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
16
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
17
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
18
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
19
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

शर्यतीत होतोच, मीच मुख्यमंत्री होणार होतो, पण..."; एकनाथ खडसेंचा पुन्हा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 19:08 IST

ऑडिओ क्लीपवरून गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंचे मानसिक संतुलन बिघडल्याची टीका केली होती. त्यावर बोलताना एकनाथ खडसे यांनी उत्तर दिलं आहे.

ठळक मुद्देसत्ता गेल्यापासून देवेंद्र फडणवीस हे माशासारखे तडफडत आहेत. ते ब्राह्मण असले तरी त्यांची सरकार पडणार असल्याची भाकिते खरे ठरतं नाहीमाझं संतुलन बिघडलं असं म्हणतात, मी ठणठणीत आहे खात्री करायची असेल तर येऊन बघावंआपली जबाबदारी सोडून तीन तीन आठवडे पश्चिम बंगालमध्ये प्रचार करायला जाणं कितपत योग्य आहे का?

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होतोच, मी मुख्यमंत्री होणार होतो पण मला डावलून दुसऱ्याला मुख्यमंत्री बनवलं असं विधान भाजपा आमदार गिरीश महाजन यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना खडसेंनी केले आहे. त्यामुळे आता एकनाथ खडसेंच्या टीकेला भाजपा नेते काय उत्तर देतात हे पाहणं गरजेचे आहे.(NCP Eknath Khadse Target BJP Devendra Fadnavis)

गेल्या काही दिवसांपासून जळगावात एकनाथ खडसेंनी ऑडिओ क्लीप व्हायरल होत आहे. यात खडसेंनी भाजपा आमदार गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधल्याचं ऐकायला मिळत आहेत. या ऑडिओ क्लीपवरून गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंचे मानसिक संतुलन बिघडल्याची टीका केली होती. त्यावर बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होतोच, मीच मुख्यमंत्री होणार होतो. पण मला डावलून दुसऱ्याला मुख्यमंत्री बनवलं हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. ‘मेहनत करे मुर्गा और अंडा खाए फकीर’ यातला हा प्रकार आहे असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत गिरीश महाजन यांच्या मतदारसंघातील लोकांनी गेल्या महिनाभरापासून माझ्याकडे तक्रार केली. पिण्याचं पाणी नाही, हॉस्पिटलमध्ये बेड्स उपलब्ध होत नाही. आपली जबाबदारी सोडून तीन तीन आठवडे पश्चिम बंगालमध्ये प्रचार करायला जाणं कितपत योग्य आहे का? माझं संतुलन बिघडलं असं म्हणतात, मी ठणठणीत आहे खात्री करायची असेल तर येऊन बघावं. मला सगळं माहिती आहे. १९९४ च्या फर्दापूरच्या भानगडीपासून सगळं माहिती आहे. मी वैयक्तिक कमेंट केली नाही. मतदारसंघातील लोकांचा संताप आहे असा इशाराही एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांना दिला आहे.

ब्राह्मण असल्यानं तुमचं भाकीत खरं ठरत नाही

सत्ता गेल्यापासून देवेंद्र फडणवीस हे माशासारखे तडफडत आहेत. ते ब्राह्मण असले तरी त्यांची सरकार पडणार असल्याची भाकिते खरे ठरतं नसल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. देवेंद्र फडणवीसांना, सत्ता कधी येईल यासाठी मला वाटतं रात्री बेरात्री पण त्यांना स्वप्न पडत असेल. सध्या सरकार पडणार असे ते सांगत आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या तारखांचे भाकीत करत आहेत. ते ब्राह्मण असल्याने त्यांचं भाकीत खरे ठरेल असं मला वाटत होतं. मात्र, त्यांचं कोणतही भाकीत खरं ठरलेले नाही असा टोला खडसेंनी फडणवीसांना लगावला होता.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसeknath khadseएकनाथ खडसेGirish Mahajanगिरीश महाजनBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसChief Ministerमुख्यमंत्री