शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

उद्धव ठाकरेंसारखे धमकावणारे मुख्यमंत्री पाहिले नाहीत; फडणवीसांची टीका

By मोरेश्वर येरम | Published: November 28, 2020 11:56 AM

ठाकरे सरकारच्या वर्षभराच्या कामगिरीवर भाजपने आज 'ठाकरे सरकारची काळी पत्रिका' नावाच्या पुस्तिकेचं प्रकाशन केलं. 

ठळक मुद्देठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीवर भाजपचा पत्रकार परिषदेतून हल्लाबोलठाकरे सरकारची काळी पत्रिका नावाच्या पुस्तिकेचं प्रकाशनसरकारने वर्षभरात केवळ स्थगिती देण्याचे निर्णय घेतले

मुंबईराज्यातील ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. ''हात धुवून मागे लागू म्हणणारे उद्धव ठाकरेंसारखे धमकावणारे मुख्यमंत्री महाराष्ट्राने आजवरच्या इतिहासात पाहिले नाहीत. उद्धव ठाकरे यांनी केलेलं वक्तव्य मुख्यमंत्र्यांच्या खूर्चीला शोभणारं नाही'', अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ठाकरे सरकारच्या वर्षभराच्या कामगिरीवर भाजपने आज 'ठाकरे सरकारची काळी पत्रिका' नावाच्या पुस्तिकेचं प्रकाशन केलं. यावेळी देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर आणि इतर भाजप नेते उपस्थित होते. फडणवीस यांनी यावेळी ठाकरे सरकार सर्वच बाबतीत सपशेल अपयशी ठरल्याचं सांगत सरकारमधील तिन्ही पक्षांमध्ये समन्वय नसल्याचं सांगितलं. सरकारने पहिल्या वर्षात फक्त निर्णयांना स्थगिती देण्याचं काम केल्याची टीका फडणवीसांना केली. अर्णब, कंगना प्रकरणात सरकार तोंडावर आपटलंसुप्रीम कोर्टाने अर्णब गोस्वामी प्रकरणात आणि मुंबई हायकोर्टाने कंगना प्रकरणात दिलेल्या निकालांवरुन फडणवीस यांनी ठाकरे सरकारला धारेवर धरलं. ''सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाने दिलेल्या निर्णयातूनच सरकारच्या कामगिरीची माहिती कळते. कायदा हा कुठल्याही व्यक्तीला लक्ष्य करण्यासाठी नसतो. सुप्रीम कोर्टाने सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलं. तर मुंबई हायकोर्टानेही कंगनाविरोधातील कारवाई अप्रमाणिक आणि अशुद्ध हेतूने केल्याचा मत नोंदवत महापालिकेची कारवाई रद्द ठरवली. यासोबत संजय राऊत यांची वागणूक संसदीय सदस्याला शोभणारी नाही असं कोर्टाने झापलं'', अशी माहिती फडणवीसांनी यावेळी दिली. शेतकऱ्यांना दिलेलं वचन मुख्यमंत्री विसरलेस्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना न दिलेलं वचन मुख्यमंत्र्यांना लक्षात राहीलं, पण शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिलेलं वचन ते विसरले, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. धान उत्पादकांना बोनस दिला याबाबत सरकारचं स्वागतच आहे पण सोयाबीन आणि कापूर उत्पादकांचं काय? त्यांना मदत देण्याची मागणी यावेळी फडणवीसांनी केली. मराठा आरक्षणावरुन सरकारचा घोळमराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने अभूतपूर्व घोळ घातला असून सरकारचं धोरण हे केवळ वेळकाढूपणाचं असल्याचं फडणवीस म्हणाले. मराठा आरक्षणाबाबत वकील आणि सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचं फडणवीस म्हणाले. सरकारला मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी इच्छाच नाही हे यातून दिसून येतं, असंही ते पुढे म्हणाले.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेना