"...पण मला तसे म्हणता येणार नाही", उपमुख्यमंत्र्यांची मिश्किल टिपण्णी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 08:51 PM2021-01-31T20:51:11+5:302021-01-31T20:52:00+5:30

Ajit Pawar : बारामती शहरातील पथदिव्यांसह भुयारी गटारींच्या कामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवारयांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अजित पवार हे पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह उपस्थित होते.

"... but I can't say that", the Deputy Chief Minister Ajit Pawar remark in baramati | "...पण मला तसे म्हणता येणार नाही", उपमुख्यमंत्र्यांची मिश्किल टिपण्णी

"...पण मला तसे म्हणता येणार नाही", उपमुख्यमंत्र्यांची मिश्किल टिपण्णी

googlenewsNext
ठळक मुद्दे'राज्याचा उपमुख्यमंत्री का असेना, त्याला देखील पत्नीचा धाक असतोच'

बारामती : बारामतीकरांना लवकरच भूमिगत पाईपमधून स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा होणार आहे. त्यामुळे गॅस सिलिंडर आणण्याच्या कटकटीपासून सर्वांचीच मुक्तता होणार आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती देत बारामतीकर पुरुष मंडळींचे चिमटे घेतले. पत्नीने सिलिंडर आणायला सांगितले तरी तिला शहाणपणा करु नको, असे उत्तर तुम्ही देऊ शकता. पण, मला तसे म्हणता येणार नाही. मला ऐकावे लागेल, अशी टिपण्णी अजित पवार यांनी करताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

बारामती शहरातील पथदिव्यांसह भुयारी गटारींच्या कामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवारयांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अजित पवार हे पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी हाच धागा पकडत पती-पत्नीच्या नात्यातील गोडव्यातुन होणाऱ्या गमती जमतीवर केलेली मिश्कील कोटी ऐकून बारामतीकरांमध्ये हशा पिकला. पवार यांनी गमंतीने हे वक्तव्य करीत कोणता ही पुरुष असो, मग तो राज्याचा उपमुख्यमंत्री का असेना, त्याला देखील पत्नीचा धाक असतोच, अशी कबुली तर दिली नाही, ना अशी मिश्कील चर्चा यावेळी रंगल्याचे दिसून आले. 

उपमुख्यमंत्री पवार यांनी बारामती शहरातील कचरा डेपो बाहेर स्थलांतरीत करण्यात येणार असल्याचे सांगितले. मात्र, कचरा डेपोचे नवीन ठिकाण पवार यांनी गुपितच ठेवले. ठिकाण ऐकल्यावर आतापासूनच विरोध होईल, असे सांगत पवार यांनी नवीन ठिकाणी आधुनिक कचरा डेपो उभारण्यात येईल. त्या ठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया केल्याने नागरीकांना कचऱ्याच्या दुर्गंधीचा त्रास होणार नाही. या कचऱ्याचे दर्जेदार खतामध्ये प्रक्रियेद्वारे रुपांतर करण्यात येणार असल्याचे सांगितले. बारामती परिसरातील सावकार तसेच वाळुमाफीयांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्याच्या सूचना पवार यांनी यावेळी पोलिसांना दिल्या. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी केले. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, उपनगराध्यक्ष तरन्नुम सय्यद, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, गटनेते सचिन सातव, नगरसेवक संजय संघवी, जय पाटील आदी नगरसेवक उपस्थित होते.
 

Web Title: "... but I can't say that", the Deputy Chief Minister Ajit Pawar remark in baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.