शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ दहशतवादी हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचा मोठा गौप्यस्फोट; पाकिस्तानवर सैन्य कारवाई का नाही?
2
कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
3
"या योजनेचं आम्ही स्वागत करतो"; ट्रम्प यांच्या 'गाझा शांतता योजने'वर PM मोदींनी काय मांडली भूमिका?
4
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
5
या स्वस्त सात सीटर कारला मिळाले फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग; मारुती अर्टिगापेक्षा खूपच सुरक्षित, भारत एनकॅपमध्ये चाचणी...
6
ईव्हीचा 'सायलेंट धोका' संपणार! इलेक्ट्रिक वाहनांसाठी AVAS ध्वनी प्रणाली अनिवार्य होणार? काय आहे प्रकार?
7
मंजूचा मृतदेह बेडवर, तर पतीचा लटकलेला; रात्री खोलीत दोघांचे मृतदेह पाहून वडील हादरले
8
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; निफ्टी ८० अंकांनी वधारला, मेटल-आयटी शेअर्समध्ये जोरदार खरेदी
10
October Baby Astro: कसे असतात ऑक्टोबरमध्ये जन्माला आलेले लोक? स्वभाव, गुण, दोष; सगळंच जाणून घ्या
11
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
12
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
14
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ
15
Aadhaar Card मध्ये बदल करायचाय तर आताच करुन घ्या, १ ॲाक्टोबरपासून वाढणार शुल्क, पाहा काय काय बदलणार?
16
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
17
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
18
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
19
October 2025 Astro: ऑक्टोबर घेऊन येतोय दसरा दिवाळी, सोबतच 'या' राशींच्या भाग्याला झळाळी!
20
जिच्यामुळे बॉलिवूडमध्ये आली, तिलाच केलं अनफॉलो! फराह खान-दीपिकामध्ये नक्की काय बिनसलं?

शहिदांचा अपमान करणाऱ्या भाजपला शिवसैनिक मत कसे देणार? प्रकाश आंबेडकर यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 07:00 IST

रा. स्व. संघ ही दहशतवादी संघटना असल्याचा आरोप

मुंबई : रा. स्व. संघ ही दहशतवादी संघटना आहे. त्यामुळे त्यांनी प्रज्ञा ठाकूरला भाजपची उमेदवारी दिली. मात्र, शहीद हेमंत करकरेंचा अपमान करणाऱ्या साध्वीचा शिवसेनेने निषेध का नोंदवला नाही? २००८ च्या हल्ल्यानंतर शहिदांचे छायाचित्र शिवसेनेच्या शाखेत लावले गेले. आता कुठल्या तोंडाने शहिदांचा अपमान करणाऱ्या भाजपला मते देणार याचे उत्तर सैनिकांनी द्यावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले.कुर्ला नेहरूनगर येथे आयोजित सभेत ते बोलत होते. आंबेडकर म्हणाले, मुंबई पोलिसांच्या धैर्यामुळे कसाब जिवंत पकडला गेला. त्यामुळे पाकिस्तानचे दहशतवादी संबंध समोर आले. ज्या पोलिसांनी देशाचे रक्षण केले त्यांचा अपमान सहन करून घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. पोलीस, निमलष्करी दलाचा आदर करायला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिकावे. मुख्यमंत्री पदाची नशा चढू देऊ नका, असेही त्यांनी ठणकावले.

शिवसेनेला भाजपच्या कुबड्यांची गरज का पडली? याचे उत्तर मिळणे गरजेचे आहे. मुंबईकरांनी खोटारड्या मोदींना घरी बसवावे, पर्याय कोण याची काळजी करू नये. देशात लोकशाही आहे त्यामुळे अध्यक्षीय पद्धतीचा पुरस्कार करणाऱ्यांनी मोदी स्वत:च्या कुटुंबाशी कसे वागले हे पाहावे. मोदींनी अजून रॉबर्ट वड्राला तुरुंगात का टाकले नाही? याचे उत्तर द्यावे. प्रियांका गांधी वाराणसीमधून मोदींविरोधात लढण्याचे सांगून नवऱ्याची काही प्रकरणे ‘सेटल’ करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.मोदी हे सर्वांत मोठे ब्लॅकमेलर आहेत. त्यांनी आतापर्यंत ब्लॅकमेल करून राजकारण केले आहे. मोदी खोटारडे व्यक्तिमत्त्व आहे. बालाकोट हल्ल्यामध्ये एकही दहशतवादी मेला नाही, याचा खुलासा सुषमा स्वराज्य यांनी केला आहे. नरेंद्र मोदी यांचेवर्तन बालीश असून, त्यांच्या खोटारडेपणामुळे देश तोंडावर पडल्याची टीकाही त्यांनी केली.
काँग्रेस ही भाजपची ‘ए’ टीम - आनंदराजआनंदराज आंबेडकर म्हणाले, वंचित आघाडी ही भाजपची ‘बी’ टीम असल्याचा आरोप चुकीचा आहे. प्रत्यक्षात काँग्रेस ही भाजपची ‘ए’ टीम आहे. काँग्रेसने नेहमीच दलित मुस्लिमांची फसवणूक केली. त्यामुळे वंचित आघाडीच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. या वेळी निहारिका खोंदले, अनिल कुमार, संजय भोसले, सुरेश शेट्टी, सुनील थोरात हे मुंबईतील सर्व सहा उमेदवार तसेच शुजात आंबेडकर, अशोक सोनावणे उपस्थित होते.ओवेसींची मुंबईतील प्रचाराकडे पाठवंचित बहुजन आघाडीतील प्रमुख घटकपक्ष असलेल्या एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मुंबईतील प्रचाराकडे पाठ फिरवल्याने एमआयएम व वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावारण आहे. भिवंडी येथील प्रचारसभेला उपस्थित राहून ओवेसी यांनी हैदराबादकडे प्रस्थान केले. आंबेडकर व ओवेसी यांची संयुक्त जाहीरसभा झाली नसल्याने कार्यकर्त्यांमधून तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे. कुर्ल्यातील सभेला एमआयएमचा एकही महत्त्वाचा नेता उपस्थित नव्हता.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरNarendra Modiनरेंद्र मोदीShiv SenaशिवसेनाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019