Gujarat local body election results 2021 : BJP's resounding victory in all 31 Zilla Parishads in Gujarat | गुजरातमध्ये शतप्रतिशत भाजपा, सर्वच्या सर्व जिल्हा परिषदांत उमलले कमळ

गुजरातमध्ये शतप्रतिशत भाजपा, सर्वच्या सर्व जिल्हा परिषदांत उमलले कमळ

अहमदाबाद - काही दिवसांपूर्वी झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपाने (BJP) एकतर्फी विजय मिळवून सहा महानगरपालिकांवर मोठ्या बहुमतासह कब्जा केला होता. त्यानंतर आता आठवडाभराने झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपालिकांच्या निवडणुकीतही भाजपाने दणदणीत विजय मिळवला आहे. (Gujarat local body election results 2021 ) गुजरातमधील निवडणूक झालेल्या ३१ जिल्हा परिषदांपैकी सर्वच्या सर्व जिल्हा परिषदांवर भाजपाचे कमल उमलले आहे. तर पंचायत समित्या आणि नगरपालिकांच्या निवडणुकीमध्येही भाजपाने निर्विवाद यश मिळवले आहे. (BJP's resounding victory in all 31 Zilla Parishads in Gujarat)

गुजरातमधील मतदान झालेल्या ३१ जिल्हा परिषदांच्या मतमोजणीत भाजपाने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली. अखेरीच सर्वच्या सर्व जिल्हा परिषदांमध्ये भाजपाने बहुमताचा दिशेने आगेकूच केली. तर प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला एकाही जिल्ह्यात सत्ता मिळवता आली नाही. तर २३१ पंचायत समित्यांपैकी १९६ पंचायस समित्यांमध्ये भाजपाने बाजी मारली आहे. तर ३३ पंचायत समित्यांवर काँग्रेसने कब्जा केला आहे. 

नगरपालिकांच्या निकालांमध्येही भाजपाचाचा बोलबाला दिसून आला. ८१ पैकी ७७ नगरपालिकांमध्ये भाजपाने सत्ता मिळवली. तर काँग्रेसला ४ नगरपालिकांमध्ये विजय मिळाला. दरम्यान, काँग्रेसचा दारुण पराभव होत असताना आपने मात्र गुजरातच्या ग्रामीण भागांमध्येही प्रवेश करण्यात यश मिळवला आहे. काही ठिकाणी आपचे उमेदवार विजयी झाले होते. 

दरम्यान, गेल्या आठवड्यात लागलेल्या गुजरातमधील सहा मोठ्या शहरातील महानगरपालिकांमध्ये भाजपाने निर्विवाद यश मिळवले होते. अहमदाबाद, बडोदा, सूरत, राजकोट, जामनगर आणि भावनगरमधील महानगरपालिकांमध्ये भाजपाने बाजी मारली होती. 

Web Title: Gujarat local body election results 2021 : BJP's resounding victory in all 31 Zilla Parishads in Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.