शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

विरोधकांची आपसात आघाडी; भाजपाची मात्र जनतेशी युती!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 6:22 AM

काँग्रेससह देशभरातील २० विरोधी पक्षांच्या नेत्यांनी शनिवारी कोलकात्यात एकत्र येत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दिलेल्या ‘मोदी हटाव, देश बचाव’ नाऱ्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी अत्यंत कडवट शब्दांत खिल्ली उडविली.

नवी दिल्ली : काँग्रेससह देशभरातील २० विरोधी पक्षांच्या नेत्यांनी शनिवारी कोलकात्यात एकत्र येत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दिलेल्या ‘मोदी हटाव, देश बचाव’ नाऱ्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी अत्यंत कडवट शब्दांत खिल्ली उडविली. ‘भ्रष्ट, घोटाळेबाज, नकारात्मक मानसिकता असलेले आणि देशाला अस्थिरतेशिवाय दुसरे काहीही न दिलेले’ स्वार्थी लोक ’महागठबंधन’च्या नावाखाली एकत्र येत आहेत, असा जोरदार पलटवार त्यांनी केला.महाष्ट्रातील हातकणंगले, कोल्हापूर, माढा आणि सातारा तसेच गोव्यातील दक्षिण गोवा या लोकसभा मतदारसंघांमधील भाजपाच्या बूथ कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने संवाद साधताना मोदी बोलत होते. पंतप्रधान म्हणाले की, विरोधी पक्ष आपसात आघाडी करण्याच्या गोष्टी करत असले तरी आपल्या पक्षाची (भाजपा) देशाच्या १२५ कोटी जनतेशी घट्ट युती आहे. या दोन्हींपैकी कोणती युती अधिक भक्कम आहे, असे तुम्हाला वाटते, असे मोदींनी कार्यकर्त्यांना विचारले.कोलकत्यामधील विरोधकांच्या मेळाव्याचा संदर्भ देत मोदी म्हणाले की, त्यांच्याकडे धनशक्ती आहे तर आमच्याकडे जनशक्ती आहे. कोलकत्यात व्यासपीठावर जे जमले होते ते एक तर वजनदार मंडळींची मुले होती किंवा ते आपल्या मुलाबाळांचे बस्तान बसवू पाहात होते. ज्या पक्षांमध्ये नावालाही अंतर्गत लोकशाही नाही तेच आज लोकशाहीच्या नावाने गळा काढून लोकांची दिशाभूल करीत आहेत, असेही ते म्हणाले. मतदानयंत्रांना ‘चोर मशिन’ असे संबोधून विरोधी नेत्यांनी आगामी निवडणूक जुन्या पद्धतीप्रमाणे मतपत्रिकेने घेण्याची मागणी केली होती. त्यावर टीका करताना मोदी म्हणाले की, आपला पराभव स्पष्ट दिसत असल्याने ही मंडळी आता मतदानयंत्राला ‘व्हिलन’ ठरवू पाहात आहेत. ते म्हणाले की, आपण निवडणूक जिंकावी असे प्रत्येक राजकीय पक्षाला वाटणे स्वाभाविक आहे. पण नेतेमंडळी लोकांना मूर्ख समजून गृहित धरू लागतात तेव्हा तो मोठा चिंतेचा विषय ठरतो.सरकारने साडेचार वर्षांत लोककल्याण व विकासाच्या विविध योजना राबवून भारताला जगात कसे मानाचे स्थान मिळवून दिले, याचा पाढा मोदींनी वाचला. कार्यकर्त्यांनी हे काम लोकांपर्यंत पोहोचवून विरोधकांचा अपप्रचार खोडून काढावा, असे त्यांनी आवाहन केले.>तेच बोफोर्सवर बोलू लागलेज्या व्यासपीठावरून हे लोक देश आणि लोकशाही वाचविण्याच्या बाता करीत होते त्याच व्यासपीठावरून एका नेत्याने बोफोर्स घोटाळ्याची आठवण करून दिली. शेवटी सत्य लपत नाही, हेच खरे! - नरेंद्र मोदी

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९