शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

एन्काऊंटर फेम माजी पोलीस अधिकारी रविंद्र आंग्रे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 7:29 PM

राफेलमधील भ्रष्टाचाराचा निषेध करत उचलले पाऊल

ठळक मुद्देमुनाफ हकीम यांचाही शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेशरविंद्र आंग्रे ठाणे जिल्हा भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस म्हणून कार्यरत होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी त्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले.

मुंबई : एन्काऊंटर फेम माजी पोलीस अधिकारी रविंद्र आंग्रे यांनी राफेल खरेदीतील भ्रष्टाचाराचा निषेध करून भाजपला सोडचिट्टी देत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांच्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस व राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे माजी अध्यक्ष मुनाफ हकीम यांनीही आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला.रविंद्र आंग्रे यांनी आज गांधीभवन येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला. ते ठाणे जिल्हा भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस म्हणून कार्यरत होते. ठाणे येथे गुन्हे शाखा व खंडणी विरोधी पथकात कार्यरत असताना ठाणे जिल्ह्यातील संघटीत गुन्हेगारी एकहाती मोडून काढली होती. मोदी सरकारने राफेल विमान खरेदीत घोटाळा करून सैनिकांचा अपमान केला आहे. त्यामुळेच आपण भाजप सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे असे रविंद्र आंग्रे म्हणाले. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस व राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे माजी अध्यक्ष मुनाफ हकीम यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात केला. अल्पसंख्यांक समाजाच्या हितासाठी फक्त काँग्रेस पक्षच काम करत आहे. त्यामुळे आपण काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे असे मुनाफ हकीम म्हणाले.  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी त्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले. विविध पक्षातून काँग्रेस पक्षात प्रवेश करणा-यांचा ओघ वाढत चालला आहे. त्यामुळे राजकीय वारे कोणत्या दिशेला वाहत आहेत हे स्पष्ट होते असे खा. अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.

टॅग्स :congressकाँग्रेसAshok Chavanअशोक चव्हाणMumbaiमुंबईBJPभाजपा