Sharad Pawar : शरद पवारांचा काँग्रेसला मोठा धक्का, काँग्रेस सोडणाऱ्या बड्या नेत्याला दिला राष्ट्रवादीत प्रवेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 19:11 IST2021-03-16T19:06:04+5:302021-03-16T19:11:08+5:30

Former Congress leader PC Chacko joins NCP : केरळमधील मोठे नेते पी.सी. चाको यांनी आज दिल्लीत शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

Former Congress leader PC Chacko joins NCP, in the presence of Sharad Pawar | Sharad Pawar : शरद पवारांचा काँग्रेसला मोठा धक्का, काँग्रेस सोडणाऱ्या बड्या नेत्याला दिला राष्ट्रवादीत प्रवेश 

Sharad Pawar : शरद पवारांचा काँग्रेसला मोठा धक्का, काँग्रेस सोडणाऱ्या बड्या नेत्याला दिला राष्ट्रवादीत प्रवेश 

नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणारे काँग्रेसचे केरळमधील मोठे नेते पी.सी. चाको यांनी आज दिल्लीत शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. चाको यांच्या पक्षप्रवेशामुळे केरळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार आहे. (Former Congress leader PC Chacko joins Nationalist Congress Party, in the presence of party chief Sharad Pawar)

केरळ विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. सी. चाको यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. मात्र काँग्रेसमधील नेत्यांनी त्यांच्या जाण्याने फार काही फरक पडणार नाही. कारण त्यांना फार जनाधार प्राप्त नाही. ते केवळ ख्रिश्चन समुदायाच्या एका गटाचे नेतृत्व करतात, असे म्हटले होते. चाको हे काँग्रेस सोडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात, असे सांगण्यात येत होते. त्यानुसार आज त्यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देताना चाको यांच्या पक्षप्रवेशामुळे मी समाधानी आणि आनंदी असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. 



केरळच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची डाव्या पक्षांसमवेत आघाडी आहे. शरद पवार व चाको यांच्यात तीन दशकांहून अधिक जुने संबंध आहेत. पवार यांनी काँग्रेस सोडून काँग्रेस एसची स्थापना केली होती, तेव्हा त्यांनी चाको यांना केरळ प्रदेशाध्यक्ष केले होते. चाको यांनी काँग्रेसचा राजीनामा देण्यापूर्वी गंभीर आरोप केले होते. पक्षात गटबाजी वाढली आहे. ओमन चंडी व रमेश चन्नेथिला यांनी आपापले गट बनवून पक्षावर नियंत्रण मिळवले आहे, असा आरोप त्यांनी पक्ष सोडताना केला होता. 

Web Title: Former Congress leader PC Chacko joins NCP, in the presence of Sharad Pawar