मोठी बातमी! वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा देण्याचे आदेश, शिवसेनेतील सूत्रांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2021 18:24 IST2021-02-27T18:20:21+5:302021-02-27T18:24:47+5:30
pooja chavan case: राज्याचे वनमंत्री संजय राठोड (sanjay rathod) यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचे आदेश पक्ष श्रेष्ठींकडून दिले गेले असल्याची माहिती

मोठी बातमी! वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा देण्याचे आदेश, शिवसेनेतील सूत्रांची माहिती
पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणावरुन आरोपांच्या भोवऱ्यात सापडलेले शिवसेनेचे आमदार आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचे आदेश पक्ष श्रेष्ठींकडून दिले गेले असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेतील विश्वसनीय सूत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे. (sanjay rathod ask to give resignation)
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच थेट वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा देण्याचे आदेश दिल्याचं बोललं जात आहे. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी राज्य सरकारची नामुष्की झाल्यानं शिवसेनेनं राठोडांच्या राजीनाम्याचे आदेश दिल्याचं बोललं जात आहे.
मंत्री राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी, भाजप महिला मोर्चाची जोरदार निदर्शने
पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणावरुन भाजपनेही महाविकास आघाडी विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यात आज सकाळीच शिवसेना नेते संजय राऊत यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे याप्रकरणी काही डोळे मिटून बसलेले नाही. ते लक्षपूर्वकपणे यावर निर्णय घेतील, असं म्हणून संजय राठोडांच्या राजीनाम्याचे संकेत दिले होते.
भाजपचा आक्रमक पवित्रा
राज्याच्या अर्थसंकप्लीय अधिवेशनाआधी संजय राठोड यांचा राजीनामा घ्या, नाहीतर अधिवेशन होऊ देणार नाही. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पूजा चव्हाण प्रकरणाबाबत सविस्तर माहिती द्यावी लागेल, असा आक्रमक पवित्रा भाजपने घेतला आहे. यासोबतच संपूर्ण राज्यभर भाजपकडून संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलनं करण्यात आली.