शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

माजी मुख्यमंत्र्यांचं भर कार्यक्रमात विधान; “कोरोनामुळं बायकोचं चुंबनही घेतलं नाही, मग...”

By प्रविण मरगळे | Updated: January 18, 2021 15:55 IST

फारूक अब्दुला यांच्या विधानाची ही व्हिडीओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

ठळक मुद्देफारूक अब्दुला यांनी पहिल्यांदा नाही तर याआधीही अशाप्रकारे विधानं केली होतीफारूक अब्दुला यांनी कोरोनामुळे उद्भवलेल्या एका अजब परिस्थितीचा किस्सा लोकांना ऐकवलाअब्दुला यांच्या या विधानामुळे उपस्थित लोकांमध्ये जोरदार हशा पिकला

जम्मू – मागील वर्षभर कोरोनाच्या दहशतीमुळे अनेक लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले, यात राजकीय नेतेही सुटले नाहीत, श्रीमंत असो वा गरीब कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे सगळ्यांनाच घरीच बसावं लागलं, यातच नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुला यांनी रविवारी लॉकडाऊनमधील एक किस्सा उपस्थितांना ऐकवला आणि सगळ्यांनाच हसू आवरलं नाही.

फारूक अब्दुला नेहमी वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. यावेळी एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात फारूक अब्दुला यांनी कोरोनामुळे उद्भवलेल्या एका अजब परिस्थितीचा किस्सा लोकांना ऐकवला, अब्दुला म्हणाले की, जेव्हापासून कोरोना महामारी आली आहे तेव्हापासून पत्नीचं चुंबनही घेतलं नाही, अब्दुलांच्या या विधानावर उपस्थित लोकांमध्ये हशा पिकला. त्यानंतर फारूक अब्दुला म्हणाले की, कोणीही हात मिळवणे अथवा मिठी मारण्यापासून घाबरत आहेत. मी स्वत:च्या पत्नीचं चुंबनही घेऊ शकलो नाही मग मनात असूनही मिठी मारण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.  

फारूक अब्दुला यांच्या विधानाची ही व्हिडीओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फारूक अब्दुला यांनी पहिल्यांदा नाही तर याआधीही अशाप्रकारे विधानं केली होती. यापूर्वी २७ मार्च २०१८ रोजी फारूक अब्दुला यांच्याकडून संसद भवनात असाच प्रकार घडला होता. अब्दुला यांनी काही स्थानिक चॅनेलला प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यावेळी काही महिला पत्रकार माईक घेऊन त्यांच्याकडे पोहचली, त्यावेळी फारूक अब्दुला यांनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि मस्करीमध्ये कोणीही मला या महिलांकडून वाचवा असं म्हणाले.

 

टॅग्स :Farooq Abdullahफारुख अब्दुल्लाcorona virusकोरोना वायरस बातम्या