शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

"ममता बॅनर्जींना पाठिंबा देण्यासाठी 50 लाखांची ऑफर", फारूक अब्दुल्ला यांना फेक कॉल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2021 9:22 AM

farooq abdullah got a fake call : विरोधी पक्षांनी फसवण्यासाठी ही युक्ती केली आहे, असा आरोप फारूक अब्दुल्ला यांनी केला आहे.

ठळक मुद्देउधमपूरमध्ये फारूक अब्दुल्ला हे कार्यकर्त्यांना संबोधित करत होते.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला यांनी मोठा खुलासा केला आहे. बनावट कॉलद्वारे फसवणूक करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप फारूक अब्दुल्ला यांनी केला आहे. मला एक फोन आला ज्याद्वारे सांगण्यात आले की, तुम्ही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या समर्थनार्थ प्रचार केला तर तुम्हाला ५० लाख रुपये मिळतील, असे फारूक अब्दुल्ला यांनी सांगितले. उधमपूरमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते बोलत होते. (farooq abdullah got a fake call where he was offered rs 50 lakh to support mamta banerjee)

फारूक अब्दुल्ला म्हणाले, "या महिन्यात मला झारखंडहून फोन आला होता, ज्यामध्ये मला सांगण्यात आले की झारखंडचे मुख्यमंत्री तुमच्याशी बोलणार आहेत, सध्या ते दुसर्‍या कॉलवर व्यस्त आहेत. त्यानंतर जवळपास अर्ध्या तासानंतर मला दुसऱ्यांदा कॉल आला. त्यावेळी सांगण्यात आले की, झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की, ते ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देण्यासाठी पश्चिम बंगालला जात आहेत. तुम्हीही ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये गेला तर तुम्हाला ५० लाख रुपये मिळतील."

'देवेगौडा यांनाही फसवण्याचा प्रयत्न'फारूक अब्दुल्ला यांच्या म्हणण्यानुसार, या घटनेनंतर त्यांनी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पार्टीच्या एका खासदारांसोबत यासंदर्भात चर्चा केली. तर त्या खासदारांनी सांगितले की, असे काहीच नाही. इतकेच नव्हे तर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनाही असाच फोन आला असल्याचे या खासदाराने सांगितले, असे फारूक अब्दुल्ला म्हणाले. दरम्यान, विरोधी पक्षांनी फसवण्यासाठी ही युक्ती केली आहे, असा आरोप फारूक अब्दुल्ला यांनी केला आहे.

याचबरोबर, जम्मू-काश्मीरमधील लोक प्रार्थना करत आहे की, भारत- पाकिस्तान दरम्यान नुकताच झालेला करार कायम रहावा, कारण यामुळे त्यांना थोडा दिलासा मिळेल, असे उधमपुरमध्ये कार्यकर्त्यांशी बोलताना फारूक अब्दुल्ला म्हणाले. तसेच, ते म्हणाले, "सीमेवरचा तणाव केवळ स्थानिक लोकांच्या जीवनात दुःख आणि वेदना आणतो, शेती व आर्थिक कामे थांबतात आणि समाजातील प्रत्येक क्षेत्रातील जीवनशैली त्याचा परिणाम होतो." 

टॅग्स :Farooq Abdullahफारुख अब्दुल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरMamata Banerjeeममता बॅनर्जीWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१