शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
2
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
3
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
4
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
5
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
6
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
7
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
8
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
9
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
10
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
11
कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; गेल्या महिन्यातच बाजारात उतरली, दिला बंपर परतावा
12
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
13
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
14
माझी पत्नी रात्रीच्या वेळी बनते नागीण आणि..., भयभीत पतीने थेट DM यांनां केली अशी विनंती, प्रकरण काय  
15
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
16
जॉन क्लार्क, मिशेल एच. डेवोरेट आणि जॉन एम. मार्टिनिस यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर
17
न्यायाधीशाची न्यायालयातच गोळ्या घालून हत्या; पिता-पुत्रही जखमी, सुनावणी सुरू असताना घडली घटना
18
Chaitanyananda Saraswati : स्वयंघोषित बाबाचं 'फाईव्ह स्टार' सीक्रेट; डीनने मुलींना दिली हॉटेलमध्ये रात्र घालवण्याची धमकी
19
VIDEO: वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात राडा! खूपच संतापला, भरमैदानात पंचांशी वाद घातला...
20
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या

कांदा निर्यात बंदीमुळे शेतकरी संतप्त; चहुबाजुने टीकास्त्र, मित्रपक्षाची नाराजी अन् भाजपा एकाकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2020 10:54 IST

केंद्र सरकारच्या या निर्णयावर महाराष्ट्रात कांदा उत्पादक शेतकरी नाराज झाला असून केंद्राने तातडीने हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी जोर धरु लागली आहे.

ठळक मुद्देकांदा निर्यात बंदी म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावून घेण्याचा प्रकारभाजप सरकार शेतकर्‍यांना परावलंबी ठेवण्याचा प्रयत्न करत आहेकेंद्र सरकारनं जे वचन शेतकऱ्यांना दिलं होतं त्याला तडा गेल्याची शंका उपस्थित होते

मुंबई – केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने सोमवारी कांद्यावर तडकाफडकी निर्यातबंदी लादली. वाणिज्य मंत्रालयाच्या विदेश व्यापार महासंचालनालयाने यासंदर्भात एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. संबंधित निर्णयाची तातडीने अंमलबजावणी सुरू झाली. या निर्णयावर शेतकरी वर्गातून संताप व्यक्त होत आहे. बंगळुरू रोझ व कृष्णापुरम या जाती वगळून सर्व प्रकारच्या कांद्याच्या निर्यातीवर वाणिज्य मंत्रालयाच्या विदेश व्यापार महासंचालनायाने बंदी घातली आहे. कांदा पावडरला या निर्यातबंदीतून वगळण्यात आले आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयावर महाराष्ट्रात कांदा उत्पादक शेतकरी नाराज झाला असून केंद्राने तातडीने हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी जोर धरु लागली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते महेश तपासे म्हणाले की, कांदा निर्यात बंदी म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावून घेण्याचा प्रकार आहे. केंद्र सरकारने सर्व प्रकारच्या कांदा निर्यातीवर बंदी घातली आहे ती तात्काळ उठवण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे.

तसेच मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये (हरियाणा आणि महाराष्ट्र निवडणूकाआधी) घातलेली निर्यात बंदी आता मार्चमध्ये उठवली होती. त्यानंतर बरोबर सहा महिन्यात पुन्हा बंदी घालण्यात आली आहे. हे भाजप सरकार शेतकर्‍यांना परावलंबी ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. शेतकर्‍यांनी ६० टक्के साठवलेला कांदा आधीच खराब झाला आहे आणि आता भाजप सरकारने निर्यात बंदी घातल्यामुळे शेतकर्‍यांना कांदा कवडीमोल भावाने विकण्याची वेळ येणार आहे. केंद्रातील भाजप सरकार शेतकरी विरोधी आहे असा आरोपही राष्ट्रवादीचे महेश तपासे यांनी केला आहे.

मित्रपक्ष रयत क्रांती संघटनाही केंद्र सरकारच्या निर्णयावर नाराज

कोरोनाच्या महामारीमुळे आधीच शेतकरी मेटाकुटीला आला आहे. आत्महत्या वाढत आहे. त्यात कांदा निर्यात बंदी निर्णयानं कांद्याचे भाव घसरले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. केंद्राने ताबडतोब हा निर्णय रद्द केला पाहिजे. केंद्र सरकारनं जे वचन शेतकऱ्यांना दिलं होतं त्याला तडा गेल्याची शंका उपस्थित होते  शेतकऱ्यांच्या निर्णयाची फक्त घोषणाबाजी केली का? असा सवाल करत केंद्राने हा निर्णय बदलावा अन्यथा शेतकरी शांत बसणार नाही. राज्य सरकारनेही याबाबत केंद्राला पत्र लिहून निर्णय मागे घेण्यास सांगावे असंही रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.    

...तर किसान सभा रस्त्यावर उतरणार

कांद्याला नियमनमुक्त करुन आवश्यक वस्तू कायद्यातून बाहेर काढून शेतकऱ्यांना दिलासा दिल्याची घोषणा केली होती. त्यानंतर कांदा निर्यात बंदी करुन शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. केंद्राच्या या निर्णयाचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे. केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात अखिल भारतीय किसान सभा रस्त्यावर उतरेल त्याची किंमत केंद्र सरकारला मोजावी लागेल असा इशारा किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी दिली आहे.

राज्यभरात भावात घसरण

लासलगाव बाजार समितीत दुपारपर्यंत कांद्याचे दर तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत गेले होते. मात्र जेएनपीटी बंदरातून कांदा पाठविला जात नसल्याचे लक्षात येताच दर घसरले. दुपारनंतर २७00 ते २८00 रुपयांपर्यंत दर खाली आले.

हजारो टन कांदा पोर्टवर अडकला

मुंबईच्या जेएनपीटी पोर्टवर ४00 कंटेनर, चेन्नईच्या पोर्टवर ८0 कंटेनर तर बांगलादेशच्या सीमेवर ३00 ट्रक माल अडकला आहे.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारonionकांदाFarmerशेतकरीSadabhau Khotसदाभाउ खोत NCPराष्ट्रवादी काँग्रेस