Farmer Protest : "शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करणारे देशद्रोही", प्रियंका गांधींनी सुनावले खडेबोल

By बाळकृष्ण परब | Published: January 28, 2021 09:55 PM2021-01-28T21:55:16+5:302021-01-28T21:56:23+5:30

Farmer Protest update : शेतकरी नेत्यांवर कारवाई करण्यासाठी सुरू असलेल्या तयारीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी ट्विट करून केंद्र सरकार आणि भाजपावर जोरदार टीका केली आहे.

Farmer Protest: Priyanka Gandhi Criticize Central Government for dividing Peasant movement | Farmer Protest : "शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करणारे देशद्रोही", प्रियंका गांधींनी सुनावले खडेबोल

Farmer Protest : "शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करणारे देशद्रोही", प्रियंका गांधींनी सुनावले खडेबोल

Next

नवी दिल्ली - केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात सध्या दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. दरम्यान, प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलकांनी आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीत हिंसाचार झाल्याने शेतकरी आंदोलनाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, आज गाझीपूर सीमेवरून शेतकरी आंदोलकांना हटवण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाने तयारी केल्याने वातावरण बिघडले आहे. शेतकरी नेत्यांवर कारवाई करण्यासाठी सुरू असलेल्या तयारीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी ट्विट करून केंद्र सरकार आणि भाजपावर जोरदार टीका केली आहे.

प्रियंका गांधी आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या की, काल रात्री शेतकरी आंदोलन लाठीच्या बळावर संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करण्यात आळा. आज गाझीपूर आणि सिंघू बॉर्डरवर शेतकऱ्यांना धमकावण्यात येत आहे. हे लोकशाहीच्या प्रत्येक नियमाच्या विरोधातील आहे. काँग्रेस शेतकऱ्यांसोबतच्या या संघर्षामध्ये उभी राहील. शेतकरी हे देशाचे हित आहे. जे शेतकऱ्यांना तोडण्याचा प्रयत्न करणारे देशद्रोही आहेत.

प्रियंका गांधी आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये म्हणाल्या की, आंदोलनातील हिंसक तत्त्वांवर कारवाई करण्यात यावी. मात्र जे शेतकरी शांततेने आंदोलन, संघर्ष करत आहेत. त्यांच्यासोबत देशाची जनता ही संपूर्ण शक्तीने उभी राहील.

प्रजासत्ताक दिनी दिल्लीमध्ये आयोजित ट्रॅक्टर रॅलीत हिंसाचार झाल्यानंतर केंद्र सरकारने आंदोलक शेतकऱ्यांविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. दिल्ली आणि उत्तर प्रदेशला जोडणाऱ्या गाझीपूरच्या सीमेवर आंदोलक शेतकऱ्यांना हटवण्यासाठी प्रशासनाने सूचना दिल्या असून, या परिसरात मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

 

 

Web Title: Farmer Protest: Priyanka Gandhi Criticize Central Government for dividing Peasant movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.