"मराठा आरक्षणावरून फडणवीस आणि भाजपा दोन्ही बाजूने खेळ खेळतायेत"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 07:43 PM2021-05-20T19:43:33+5:302021-05-20T19:47:00+5:30

nawab malik : देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाचे १६ टक्के आरक्षण योग्यच आहे, तशी भूमिका केंद्राने सुप्रीम कोर्टात मांडावी अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करावी असा सल्लाही नवाब मलिक यांनी दिला आहे.

"Fadnavis and BJP are playing games on Maratha reservation" - nawab malik | "मराठा आरक्षणावरून फडणवीस आणि भाजपा दोन्ही बाजूने खेळ खेळतायेत"

"मराठा आरक्षणावरून फडणवीस आणि भाजपा दोन्ही बाजूने खेळ खेळतायेत"

googlenewsNext
ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस हे वकील आहेत. त्यामुळे वकिलांना 'चित भी मेरी और पट भी मेरी' या पद्धतीने बोलता येते असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला आहे.

मुंबई : ओबीसी समाजाचे आरक्षण अबाधित ठेवून जे मराठा आरक्षण आहे, ते अतिरिक्त आरक्षण दिले पाहिजे ही पहिल्यापासून राज्य सरकारची भूमिका आहे. परंतु देवेंद्र फडणवीस आणि भाजपा दोन्ही बाजूने खेळ खेळत आहे. कधी ओबीसी तर कधी मराठा समाजाला भडकवणे हे राजकारण बंद करावे, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिला आहे. (NCP leader Nawab Malik slams BJP and Devendra Fadnavis on Maratha Reservation)

देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाचे १६ टक्के आरक्षण योग्यच आहे, तशी भूमिका केंद्राने सुप्रीम कोर्टात मांडावी अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करावी असा सल्लाही नवाब मलिक यांनी दिला आहे.  तसेच, देवेंद्र फडणवीस हे वकील आहेत. त्यामुळे वकिलांना 'चित भी मेरी और पट भी मेरी' या पद्धतीने बोलता येते असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला आहे. 

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणावर राज्य सरकारला अधिकारच नाही असा निकाल दिला आहे. संसदेत केंद्राने राज्याचा अधिकार अबाधित राहील, असे स्पष्ट केले होते. परंतु सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यावर फेरविचार याचिका केंद्राने दाखल केली आहे. मात्र ती महाराष्ट्रासाठी नाही तर सर्व राज्ये तुटून पडणार म्हणून दाखल केल्याचे नवाब मलिक म्हणाले. 

(शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे संवेदनशीलपणे करा, आशिष शेलारांच्या अधिकाऱ्यांना सूचना)

याचबरोबर,  देवेंद्र फडणवीस कायद्याच्या चौकटीत राहून केले असल्याचे सांगत आहेत तर सुप्रीम कोर्टाने राज्याला अधिकारच नाही सांगितले आहे राज्याचे अधिकार अबाधित ठेवण्यासाठीच केंद्राने फेरविचार याचिका दाखल केली आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.

सुरुवातीपासूनच म्हणजे आरक्षण देण्यात आले तेव्हापासून ओबीसींचा कोटा अबाधित ठेवून अतिरिक्त आरक्षण देण्याचा पहिल्यांदासुध्दा निर्णय झाला होता आणि आता आमच्या आघाडी सरकारमध्ये जो कायदा मंजूर करण्यात आला त्यामध्येही एकमताने प्रस्ताव आहे. अजून यापुढेही राज्य सरकारची भूमिका तीच राहणार आहे, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. 

आता आमची भूमिका आहे तीच भाजपची भूमिका आहे. याच्यावर एकमत असताना त्याच्यावर भाष्य करण्याची गरज नाही. भाष्य करुन काय संदेश देऊ इच्छित आहेत. समाजासमाजात भेद निर्माण करण्यासाठी बोलत आहे का? असा प्रश्न निर्माण होत असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले.

Web Title: "Fadnavis and BJP are playing games on Maratha reservation" - nawab malik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.