शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

आता तरी भाजपने प्रमाणिकपणे विरोधी पक्षाचं काम करावं; रोहित पवारांचा खोचक सल्ला

By मोरेश्वर येरम | Updated: December 4, 2020 13:34 IST

रोहित पवार यांनी विजय उमेदवारांचं अभिनंदन करणारं एक ट्विट केलं आहे. यात त्यांनी भाजपलाही खडेबोल सुनावले आहेत. 

ठळक मुद्देजनतेला भाजपला त्यांची जागा दाखवून दिल्याचा रोहित पवारांचा घणाघातमहाविकास आघाडीच्या विजयी उमेदवारांचं रोहित यांनी केलं अभिनंदनभाजपला प्रमाणिकपणे विरोधी पक्षाचं काम करण्याचा दिला सल्ला

मुंबईपदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाल्यानंतर सत्ताधाऱ्यांकडून भाजपवर जोरदार टीका केली जात आहे. यात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचीही भर पडली आहे. "भाजपच्या पुणे, नागपुरच्या बुरुजालाही सुरुंग लावत महाविकास आघाडीने विजय प्राप्त केला. आतातरी भाजपने खऱ्या अर्थाने विरोधी पक्ष म्हणून प्रमाणिक काम करावं", असा खोचक सल्ला रोहित पवार यांनी दिला आहे.

राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात महाविकास आघाडीला एकजुटीचं फळ मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपला केवळ एका जागेवर यश मिळालं असून पुणे आणि नागपूरची जागा भाजपचा बालेकिल्ला म्हणून समजली जात होती. या जागावंरही महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. रोहित पवार यांनी विजय उमेदवारांचं अभिनंदन करणारं एक ट्विट केलं आहे. यात त्यांनी भाजपलाही खडेबोल सुनावले आहेत. 

"भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असली तर महाविकास आघाडीसाठी निष्ठेची होती. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेसह सहयोगी पक्षांच्या तळागळातील कार्यकर्त्यांनी एकमेकांबद्दल दाखवलेली निष्ठाच आज कामी आली. या निवडणुकीत जनतेने महाविकास आघाडीची मनातील जागा कायम ठेवून भाजपला त्यांची 'जागा' दाखवून दिली आहे", असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे. 

रोहित पवार यांनी आणखी एका ट्विटमध्ये भाजपला सल्ला देऊ केला. "भाजपच्या म्हणवल्या जाणाऱ्या नागपूर, पुण्यासारख्या बुरुजालाही सुरुंग लावत महाविकास आघाडीने विजयाचा झेंडा रोवला आहे. त्यामुळं आता तरी भाजपने खऱ्या अर्थाने विरोधी पक्ष म्हणून प्रमाणिकपणे काम करण्यास सुरुवात करायला हरकत नाही", असं रोहित पवार म्हणाले. 

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा