With the entry of Eknath Khadse from BJP, one of the two ministers of NCP will have to resign? | एकनाथ खडसेंच्या प्रवेशानं राष्ट्रवादीच्या ‘या’ २ मंत्र्यांपैकी एकाला द्यावा लागणार राजीनामा?

एकनाथ खडसेंच्या प्रवेशानं राष्ट्रवादीच्या ‘या’ २ मंत्र्यांपैकी एकाला द्यावा लागणार राजीनामा?

ठळक मुद्देएकनाथ खडसेंना कृषीमंत्री बनवण्यात येईल, पण त्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीत खात्यांची अदलाबदल करावी लागेलराजकीय चर्चानुसार शिवसेना कृषी खात्याच्या बदल्यात राष्ट्रवादीकडून गृहनिर्माण खाते घेऊ शकतेएकनाथ खडसेंच्या रुपाने राष्ट्रवादीला उत्तर महाराष्ट्रात बळ मिळालं आहे, त्यामुळे त्यांचा मंत्रिपद देण्याची शक्यता जास्त आहे

मुंबई – भाजपा सोडून राष्ट्रवादी प्रवेश करण्याचा निर्णय घेणाऱ्या एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीत सन्मानाचं स्थान दिलं जाईल. गेल्या ४० वर्षापासून एकनाथ खडसे यांनी भाजपा वाढवण्यासाठी प्रयत्न केला, त्यामुळे खडसेंना राष्ट्रवादीत घेतल्यामुळे पक्षाला उत्तर महाराष्ट्रात बळ मिळणार आहे. मात्र एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे पक्षातील घडामोडींना वेग आला आहे.

एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीत प्रवेश दिल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळात घेणार असल्याची चर्चा आहे. मात्र त्यासाठी राष्ट्रवादीच्या एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागेल. सध्यातरी राष्ट्रवादीत जितेंद्र आव्हाड आणि दिलीप वळसे पाटील या दोन मंत्र्यांची नाव चर्चेत आहे. एकनाथ खडसेंना कृषीमंत्री बनवण्यात येईल, पण त्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीत खात्यांची अदलाबदल करावी लागेल. सध्या शिवसेनेचे दादा भुसे हे कृषीमंत्री आहेत. त्यामुळे एकनाथ खडसेंना हे पद देण्यासाठी त्याबदल्यात शिवसेनेला दुसरं खातं द्याव लागणार आहे.

...तेव्हा राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी मागितला होता खडसेंचा राजीनामा; हा पाहा पुरावा!

राजकीय चर्चानुसार शिवसेना कृषी खात्याच्या बदल्यात राष्ट्रवादीकडून गृहनिर्माण खाते घेऊ शकते. त्यामुळे गृहनिर्माण खात्याचे विद्यमान मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा राजीनामा घेतला जाऊ शकतो. करमुसे प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांच्यावर गंभीर आरोप लागले. त्यामुळे ते वादात सापडले. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांना मंत्रिपदावरून हटवून पक्षात प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाईल असं बोललं जात आहे. तर दिलीप वळसे पाटील यांच्या तब्येतीच्या कारणामुळे फारसे सक्रीय नसल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड किंवा दिलीप वळसे पाटील या दोन मंत्र्यांपैकी एकाला राजीनामा द्यावा लागू शकतो.

कारस्थान कुठवर सहन करणार? फडणवीसांनी मला पक्ष सोडण्यास भाग पाडलं

मला आजवर खूप पदे मिळाली. त्यामुळे पक्ष अथवा दिल्लीतील नेतृत्वाविरुद्ध माझी तक्रार नाही. अंजली दमानिया यांनी माझ्याविरुद्ध विनयभंगाचा खोटा खटला कोर्टात दाखल केला. पोलीस तयार नसताना फडणवीस यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. यासंदर्भात आपण फडणवीस यांच्याकडे विचारणा केली असता ती महिला गोंधळ करत होती म्हणून नाइलाजाने मला आदेश द्यावे लागले, असे उत्तर मला मिळाले. सुदैवाने पंधरा दिवसांपूर्वीच या गुन्ह्यातून निर्दोष मुक्त झालो आहे. मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतरही आपण चार वर्षे वाट पाहिली. पण सतत अन्याय करण्यात आला. पीएने लाच मागितल्याच्या कथितप्रकरणात माझ्यावर नऊ महिने पाळत ठेवण्यात आली, असेही खडसे यांनी सांगितले.

एकनाथ खडसेंनी हातात ‘घड्याळ’ बांधलं आता पंकजा मुंडेंनी 'शिवबंधन' बांधावं, शिवसेनेची ऑफर

माझा रोष देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. त्यांनी पक्ष सोडण्यास भाग पाडले. कारण, ते मुख्यमंत्री झाल्यानंतरच मला राजकीय जीवनातून संपवण्याचे काम सुरू झाले. ‘मुख्यमंत्री पदावर बहुजन व्यक्ती असावी,’ असे ज्या वेळेस मी म्हटले त्या वेळेपासून हे षड्यंत्र रचले गेले व अनेक प्रकरणे माझ्यामागे लावण्यात आली, असा आरोपही खडसे यांनी केला आहे.

मला व्हिलन ठरवलं जातंय : फडणवीस

एकनाथ खडसे अर्धसत्य सांगत आहेत. अशावेळी कोणाला तरी व्हिलन ठरवावे लागते. त्यानुसार मला व्हिलन ठरवत आहेत. माझ्याबाबत काही समस्या होती तर त्यांनी तशी तक्रार वरिष्ठांकडे करायला हवी होती, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खडसे यांच्या पक्षांतरावर प्रतिक्रिया दिली. खडसे यांच्यामुळे पक्षाचे कितपत नुकसान होईल, असे विचारले असता फडणवीस म्हणाले, काहीना काही नुकसान होत असतं; परंतु भाजप हा मोठा पक्ष आहे. कोणाच्या जाण्याने थांबत नाही किंवा येण्याने इकडेतिकडे होत नाही असंही फडणवीस म्हणाले.

Web Title: With the entry of Eknath Khadse from BJP, one of the two ministers of NCP will have to resign?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.