एकनाथ खडसे यांचा सस्पेन्स कायम; फडणवीसांच्या कार्यक्रमाला नक्की जाणार का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2020 06:55 IST2020-10-12T02:07:49+5:302020-10-12T06:55:44+5:30
Eknath Khadse, Devendra Fadanvis News: गेल्या चार दिवसांपासून मुंबई येथे असलेले खडसे हे शनिवारी रात्री उशिरा जळगावात परतले.

एकनाथ खडसे यांचा सस्पेन्स कायम; फडणवीसांच्या कार्यक्रमाला नक्की जाणार का?
जळगाव : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जामनेर येथे होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचे की नाही याबाबत एकनाथ खडसे यांनी सस्पेन्स कायम ठेवला आहे. फडणवीस यांच्या सोबत उपस्थित राहायचे की नाही याबाबत उत्सुकता राहू द्या, आत्ताच सगळे सांगून कसे चालेल, असे वक्तव्य खडसे यांनी व्यक्त केले.
गेल्या चार दिवसांपासून मुंबई येथे असलेले खडसे हे शनिवारी रात्री उशिरा जळगावात परतले. त्यानंतर रविवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या चर्चेबाबत बोलण्यास नकार दिला. माजी मंत्री गिरीश महाजन यांनी जामनेर येथे सुरू केलेल्या रुग्णालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम मंगळवारी होणार आहे.