शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

एकनाथ खडसे पुन्हा फडणवीसांवर बरसले; थेट मोदी-शहांची नावं घेऊन बोलले

By कुणाल गवाणकर | Published: October 22, 2020 11:45 AM

eknath khadse devendra fadnavis narendra modi amit shah: खडसेंचं फडणवीस यांच्यावर पुन्हा शरसंधान; नेतृत्त्वानं गांभीर्यानं न घेतल्याचा आरोप

जळगाव: भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसेंनी काल पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. खडसे उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील. त्याआधी आज पत्रकारांशी संवाद साधताना खडसेंनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरसंधान साधलं. माझा नेमका गुन्हा काय, पक्षातल्या इतर मंत्र्यांवरही आरोप झाले असताना केवळ माझाच राजीनामा का घेतला, मला वेगळी वागणूक का दिली गेली, असे अनेक प्रश्न उपस्थित केले. ...अन् फडणवीसांनी ताफ्याची दिशाच बदलली; गाडी अचानक 'त्या' दिशेनं वळवलीभाजप-शिवसेनेचं सरकार असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातल्या अनेक मंत्र्यांवर आरोप झाले. मात्र केवळ मलाच राजीनामा देण्यास सांगण्यात आलं. इतरांना मात्र क्लीन चीट देण्यात आल्या. इतरांना आणि मला वेगळा न्याय का, असा सवाल खडसेंनी विचारला. फौजदारी गुन्हे असलेल्या, इतर पक्षांमधून आलेल्यांना पाठिशी घालण्यात आलं. पण पक्षासाठी ४० वर्षे राबणाऱ्या नेत्यावर सातत्यानं अन्याय करण्यात आला, अशा शब्दांत खडसेंनी फडणवीस यांना लक्ष्य केलं.भाजप सोडणाऱ्यांची यादी मोठी; पण काहींनाच झाला फायदामाझ्यावर होत असलेल्या अन्यायाची व्यथा मांडण्यासाठी वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. मात्र कोणीही मला गांभीर्यानं घेतलं नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. 'दिल्लीत जाऊन भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. माझ्यावर झालेला अन्याय त्यांना सांगितला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना भेटलो. गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून गाऱ्हाणं मांडलं. तुम्ही देवेंद्र यांना घेऊन या. आपण चर्चेतून मार्ग काढू असं सांगण्यात आलं. हा निरोप मी देवेंद्रजींना दिला. त्यावर पुढील आठवड्यात जाऊ. पुढील महिन्यात जाऊ, असं म्हणत त्यांनी ४ वर्षे घालवली,' असं खडसे यांनी सांगितलं.एकनाथ खडसेंनी हातात ‘घड्याळ’ बांधलं आता पंकजा मुंडेंनी 'शिवबंधन' बांधावं, शिवसेनेची ऑफरदेवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्त्व फारच सक्षम आहे. त्यांच्यामुळेच आम्ही राज्यातील सत्ता गमावली, असा उपरोधिक टोलाही खडसेंनी लगावला. २०१४ मध्ये आमच्याकडे पैसा, साधनं नव्हती. तरीही आम्ही विधानसभा निवडणुकीत शिवसेना सोबत नसतानाही १२३ जागा जिंकलो. पण २०१९ मध्ये केंद्रात, राज्यात सत्ता असताना, शिवसेनेसोबत युती असतानाही १०५ जागांवर आलो. देवेंद्रजी मी पुन्हा येईन म्हणत होते. लोकांना हा अहंकार आवडला नाही. त्याऐवजी आम्ही पुन्हा येऊ म्हणायला हवं होतं, असं खडसे म्हणाले.

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहा