खडसेंना राष्ट्रवादीत मिळणार मोठी जबाबदारी?; दस्तुरखुद्द खडसेंनीच दिले संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2020 11:26 AM2020-10-25T11:26:09+5:302020-10-25T11:28:53+5:30

Eknath Khadse NCP: राष्ट्रवादी कार्यालयात एकनाथ खडसेंचा स्वागत सोहळा

eknath Khadse likely to get key responsibility in NCP | खडसेंना राष्ट्रवादीत मिळणार मोठी जबाबदारी?; दस्तुरखुद्द खडसेंनीच दिले संकेत

खडसेंना राष्ट्रवादीत मिळणार मोठी जबाबदारी?; दस्तुरखुद्द खडसेंनीच दिले संकेत

Next

जळगाव:  माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर दसऱ्याला प्रथमच राष्ट्रवादी कार्यालयात भेट दिली. वाईट प्रवृत्तींशी लढण्याचा हा दिवस असून अपल्यालाही समाजातील वाईट प्रवृत्तींविरोधात लढायचे असल्याचे खडसे यावेळी म्हणाले. अद्याप मोठे स्वागत बाकी आल्याचे सांगत एकप्रकारे मोठे पद मिळण्याचे संकेतच त्यांनी दिले आहेत. 

राष्ट्रवादीच्या कार्यालयात खडसे दाखल होताच फटाके फोडून फुलांची उधळण करण्यात आली. महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांचे औक्षण केले. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची गर्दी उसळली होती. काही वेळ गोंधळाचे वातावरण झाले होते. आज पहिलाच दिवस असल्याने आपण जास्त काही बोलणार नाही असे खडसे यांनी सुरवातीलाच स्पष्ट केले. सर्वांनी मिळून संघटना वाढविली तर नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उत्तर महाराष्ट्रात नंबर एकचा पक्ष होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

या स्वागत सोहळ्याला माजी आमदार मनीष जैन, राष्ट्रवादीचे महानगर जिल्हाध्यक्षय अभिषेक पाटील, ज्ञानेश्वर महाजन, ऍड कुणाल पवार, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षय कल्पना पाटील, जयश्री पाटील, ममता तडवी आदींसह  पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित  होते.  

जगवानी पुस्तकातून करणार गौप्यस्फोट
माजी आमदार गुरुमुख जगवानी यानीही एकनाथ खडसे यांच्या सोबत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. आपल्यावर जिल्ह्यात काय काय आणि कोनी कोणी अन्याय केला हे उतरण या आपल्या पुस्तकातून आपण मांडले असून लवकरच हे पुस्तक प्रकाशित होणार असल्याची माहिती जगवानी यांनी माध्यमांना दिली. जिथे एकनाथ खडसे तिथे आपण, असे संगत आपण राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले. आपल्यावर जिल्ह्ययात अन्यान झाला आहे मात्र आपण कोणाचेही नाव घेणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 2016 मध्ये मला बिनविरोध निवडून आणण्यासाठी खडसेंनी एवढे कष्ट सोसले असताना आता त्यांच्या कठीण काळात मी त्यांना एकटे कसे सोडणार, असेही ते म्हणाले.

Web Title: eknath Khadse likely to get key responsibility in NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.