मुंबई: शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयांवर सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) छापे टाकले आहेत. सरनाईक सध्या परदेशात असल्याची माहिती मिळत आहे. ईडीनं आपल्याला कोणतीही नोटीस दिली नव्हती. त्यांनी थेट घर आणि कार्यालयांवर धाड टाकल्याचा आरोप सरनाईक यांनी केला. सरनाईक यांचा मुलगा विहंगला ईडीनं ताब्यात घेतलं असून धाडसत्र सुरूच आहे. 'त्या' १०० लोकांची यादी द्या, कारवाई होईल; फडणवीसांचा संजय राऊतांना 'शब्द'सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयांवर ईडीनं छापे टाकल्यानंतर राज्यातलं राजकारण तापू लागलं आहे. शिवसेनेसह महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केला आहे. केंद्राकडून तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा गंभीर आरोप सरकारमधील नेत्यांनी केला. यानंतर आता भाजप नेत्यांशी महाविकास आघाडीतल्या नेत्यांना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यात जुंपल्याचं पाहायला मिळत आहे.मोठी बातमी! प्रताप सरनाईकांच्या मुलाला ईडीने घेतले ताब्यातआमदार प्रताप सरनाईक घरी नसताना धाडी टाकण्यात कसली मर्दानगी?, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. त्यावर अभिनेत्री कंगना राणौत कार्यालयात नसताना, ती मुंबईबाहेर असताना तिचं कार्यालय बुलडोझर लावून पाडण्यात कोणती मर्दानगी होती?, असा प्रतिसवाल दरेकरांनी केला आहे. मर्दानगीच्या व्याख्या सोयीनुसार बदलतात का?, असा खोचक प्रश्नदेखील त्यांनी राऊत यांना विचारला.'मला ईडीकडून कोणतीही नोटीस देण्यात आली नव्हती, पण...'; प्रताप सरनाईकांनी दिली प्रतिक्रिया
"राऊतजी, कंगना कार्यालयात नसताना कारवाई करण्यात कोणती मर्दानगी होती?"
By कुणाल गवाणकर | Updated: November 24, 2020 18:13 IST