शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

नितीश कुमार मुख्यमंत्रिपद सोडणार?; 'त्या' विधानानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

By कुणाल गवाणकर | Published: December 28, 2020 9:40 AM

भाजपनं ६ आमदार फोडल्यानं नितीश कुमार आणि जेडीयू भाजपवर नाराज

पाटना: पक्षाची धुरा रामचंद्र प्रसाद सिंह यांच्याकडे सोपवल्यानंतर आता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आणखी एक मोठं विधान केलं आहे. त्यामुळे बिहारच्या राजकारणात खळबळ माजली असून कुमार आता नेमकं काय करणार, याची चर्चा सुरू झाली आहे. मला मुख्यमंत्रिपद नको. राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं (एनडीए) मुख्यमंत्री कोणाला करायचं ते ठरवावं, असं नितीश कुमार यांनी म्हटलं आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत नितीश यांनी अध्यक्षपदासाठी रामचंद्र प्रसाद सिंह यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. तो मंजूरदेखील झाला. त्यामुळे आता रामचंद्र प्रसाद सिंह संयुक्त जनता दलाचं नेतृत्त्व करतील. पक्षाची धुरा सिंह यांच्याकडे सोपवल्यानंतर नितीश यांनी मुख्यमंत्रिपदावरही भाष्य केलं. 'मी मुख्यमंत्रिपद स्वीकारावं यासाठी बराच आग्रह करण्यात आला. माझ्यावर बराच दबाव होता. त्यामुळे मी मुख्यमंत्रिपद स्वीकारलं. पण मला खुर्चीचा मोह नाही,' असं नितीश कुमार म्हणाले.राज्यसभा खासदार नितीशकुमारांचा नवा राजकीय वारसदार; बिहारच्या राजकारणात खळबळजेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत नितीश यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्रिपदाबद्दल त्यांचं मत स्पष्ट केलं. 'भाजपला मुख्यमंत्रिपद हवं असल्याचं लोक म्हणतात. मला त्याची कोणतीही चिंता नाही. मी खुर्चीला, पदाला चिकटून राहणारा नेता नाही. निवडणुकीचा निकाल आल्यानंतर मी एनडीएकडे माझी इच्छा बोलून दाखवली. पण माझ्यावर इतका दबाव होता की मला पुन्हा मुख्यमंत्रिपद स्वीकारून काम सुरू करावं लागलं,' असं नितीश यांनी सांगितलं.भाजपनं (नंबर)गेम केल्यानं नितीश नाराज; आज शिवसेना स्टाईलनं उत्तर देणार?जेडीयू-भाजपमधील तणाव वाढलाबिहारमध्ये एनडीएमधील तणाव वाढला आहे. भाजप आणि जेडीयू यांच्यातील दरी रुंदावत चालली आहे. अरुणाचल प्रदेशमधील जेडीयूच्या सातपैकी सहा खासदार भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपनं धक्का दिल्यानं जेडीयूनं नाराजी व्यक्त केली. अरुणाचल प्रदेशमध्ये घडलेली घटना युतीत असलेल्या दोन पक्षांसाठी चांगली नाही, अशी भावना जेडीयूकडून व्यक्त करण्यात आली होती. अरुणाचल प्रदेशमधील राजकीय घडामोडीचा परिणाम बिहारमध्ये होणार नाही, असं जेडीयूनं स्षष्ट करण्यात आलं. मात्र तरीही जेडीयूच्या नेत्यांमध्ये असलेली नाराजी लपून राहिलेली नाही.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारJanta Dal Unitedजनता दल युनायटेडBJPभाजपा