शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

देशाची संपत्ती विकणं चुकीचं, नोटबंदीपासूनच देशाच्या अर्थव्यवस्थेवर संकट; सोनिया गांधींचा मोंदींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2021 3:16 PM

Sonia Gandhi Vs Pm Narendra Modi : सरकारनं घाईगडबडीत निर्णय घेण्यापासून वाचलं पाहिजे, सोनिया गांधींचा सल्ला

ठळक मुद्देभारतीय अर्थव्यवस्थेवर संकटाची सुरूवात ८ नोव्हेंबर २०१६ च्या रात्रीपासून, सोनिया गांधींची टीकासरकारनं घाईगडबडीत निर्णय घेण्यापासून वाचलं पाहिजे, सोनिया गांधींचा सल्ला

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी घसरणाऱ्या अर्थव्यवस्थेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ज्या प्रकारे सरकारनं नोटबंदी आणि जीएसटीचा निर्णय घाईगडबडीत घेतला होता त्याच प्रमाणे सरकार आता सरकारी संपत्तींच्या विक्रीचा निर्णय घेत आहे. सरकारनं घाईगडबडीत निर्णय घेण्यापासून वाचलं पाहिजे, असंही त्या म्हणाल्या."भारतीय अर्थव्यवस्थेवर संकटाची सुरूवात ८ नोव्हेंबर २०१६ च्या रात्रीपासून झाली. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी पुढचा विचार करून नोटबंदीमुळे देशाच्या जीडीपीमध्ये २ टक्क्यांची घरसण होईल असं संसदेत म्हटलं होतं. परंतु त्यांचा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्णपणे नाकारला. आज देश त्या नोटबंदीच्या झळा सोसत आहे. जीएसटीनंदेखील अर्थव्यवस्थेवर घाला घातला आहे. जीएसटीमुळे अर्थव्यवस्था अधिक खोलात जात आहे," असं सोनिया गांधी म्हणाल्या. त्यांनी द हिंदू या वृत्तपत्रामध्ये एक लेख लिहिला आहे. या लेखातून त्यांनी पंतप्रधानांवर हल्लाबोल केला. 

निर्गुतवणुकीऐवजी खासगीकरण"यापूर्वीच्या सरकारांनी अनेक दशकांच्या मेहनतीनं उभ्या केलेल्या कंपन्या आणि जनतेची संपत्ती घाईगडबडीत विकून सरकार खजाना भरण्याच्या विचारात आहेत. सरकारनं निर्गुतवणुकीऐवजी खासगीकरणाचं धोरण अवलंबलं आहे," असंही त्या म्हणाल्या. एलआयसी आणि त्याच्या प्रस्तावित आयपीओद्वारे सरकारचा हिस्सा विकणं भारतातील विमा क्षेत्रातील या अग्रगण्य कंपनीला खासगी कंपनीच्या हाती सोपवण्याच्या दृष्टीनं टाकलेलं पाऊल आहे का? खासगीकरण केल्यानंतर ऐतिहासिक रूपानं समाजातील आरक्षण आणि काही घटकांना मिळणारी संधीही संपणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. एनपीएवरूनही घेरलंएनपीएवरूनही सोनिया गांधी यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. "या सरकारच्या कार्यकाळात देशाचा पैसा घेऊन पलायन करणाऱ्या लोकांची संख्या वेगानं वाढली आहे. हे सरकार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचं खासगीकरण करू पाहत आहे," असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीManmohan Singhमनमोहन सिंगGSTजीएसटीRahul Gandhiराहुल गांधीDemonetisationनिश्चलनीकरण