शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

Bihar Assembly Election Result : फासा पलटला! भाजपाला राजदने टाकले मागे; 14 जागांचाच निकाल हाती

By हेमंत बावकर | Updated: November 10, 2020 18:34 IST

Bihar Election Result 2020 : बिहारच्या मतमोजणीला रात्री उशीर होणार आहे. कोरोनामुळे मतमोजणी केंद्र वाढविण्यात आली आहेत. यामुळे मध्यरात्रीपर्यंत मोजणी सुरु राहणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

पटना : बिहारमध्ये जसजसा निकालाला विलंब होऊ लागला आहे तसतसा फासाही पलटू लागला आहे. बिहारमध्ये सकाळी 10 वाजल्यापासून भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला होता. आता मात्र, 6 वाजता निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार राजद सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. 

बिहारच्या मतमोजणीला रात्री उशीर होणार आहे. कोरोनामुळे मतमोजणी केंद्र वाढविण्यात आली आहेत. यामुळे मध्यरात्रीपर्यंत मोजणी सुरु राहणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. मतमोजणी सुरु करून 10 तास उलटले तरी अद्याप केवळ 14 जागांचाच निकाल हाती आला आहे. यामध्ये भाजपा 6 जागांवर जिंकली आहे. एमआयएमने पहिल्यांदाच खाते उघडले आहे. काँग्रेस १, जदयू २, राजद २ आणि व्हीआयपी पक्षाने 2 जागा जिंकल्या आहेत. 

दरम्यान, राजदने भाजपाचा सर्वात मोठ्या पक्षाचा खिताब काही काळासाठी का होईन काढून घेतला आहे. आजतकने दिलेल्या आकडेवारीनुसार एनडीए 123 तर राजद महाआघाडी 113 जागांवर आघाडीवर आहे. तर निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार भाजपा 72, राजद 74, जदयू 43, काँग्रेस 20, सीपीआयएल 12 आणि इतर जागांवर अन्य पक्ष आघाडीवर असल्याचे म्हटले आहे. 

दरम्यान, पटनाच्या जदयू कार्यालयावर पोस्टरबाजी सुरु झाली असून जनतेने 24 कॅरेट सोने निवडले असे म्हटले आहे. संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत 2.60 कोटी मतांची मोजणी झाली होती. 

निकाल मध्यरात्रीबिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल हळूहळू स्पष्ट होत आहेत, मात्र अद्यापही निकालांच्या आकड्यात काहीही होऊ शकते अशी स्थिती आहे. याचवेळी बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, यंदा मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी वेळ लागेल. आतापर्यंत एक कोटीपेक्षा जास्त मतांची मोजणी झाली आहे. यावेळी मतदान केंद्रांची संख्या ६३ टक्क्यांनी जास्त होती, २०१५  मध्ये ३८ ठिकाणी मतदान केंद्रे बांधली गेली होती पण यावेळी ५८ ठिकाणी मतदान केंद्रे होती असं डीईसी चंद्रभूषण यांनी सांगितले.\

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकTejashwi Yadavतेजस्वी यादवBJPभाजपाNitish Kumarनितीश कुमार