Chiplun Flood: “भास्कर जाधव यांचे वर्तन योग्य नाही”; देवेंद्र फडणवीसांनी चांगलेच सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 02:17 PM2021-07-26T14:17:18+5:302021-07-26T14:18:49+5:30

Chiplun Flood: चिपळूणमध्ये मुख्यमंत्री पाहणी करायला गेले असताना घडलेल्या घटनेवरून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत.

devendra fadnavis criticized bhaskar jadhav over chiplun flood incident | Chiplun Flood: “भास्कर जाधव यांचे वर्तन योग्य नाही”; देवेंद्र फडणवीसांनी चांगलेच सुनावले

Chiplun Flood: “भास्कर जाधव यांचे वर्तन योग्य नाही”; देवेंद्र फडणवीसांनी चांगलेच सुनावले

Next
ठळक मुद्देजनतेचा आक्रोश पाहायला मिळतोयभास्कर जाधव यांनी केलेले वर्तन योग्य नाहीवर्षभरातील तीन मोठ्या घटनेमुळे कोकणवासीय उद्ध्वस्त झालेत - फडणवीस

मुंबई: गेला आठवडाभर वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या तुफान पावसामुळे मुंबई, कोकणासह सांगली, कोल्हापूर यांसारख्या अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत शेकडो जणांचा मृत्यू झाला. लाखो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक राजकीय नेतेमंडळींनी पूरग्रस्त भागांना भेटी दिल्या. चिपळूणमध्ये मुख्यमंत्री पाहणी करायला गेले असताना घडलेल्या घटनेवरून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. भास्कर जाधव यांचे वर्तन योग्य नाही, असे भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. (devendra fadnavis criticized bhaskar jadhav over chiplun flood incident) 

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात महापूर आला आहे. यामुळे जनतेचा आक्रोश पाहायला मिळतो. मात्र, त्यासाठी अंगावर जाणे योग्य नाही. भास्कर जाधव यांनी केलेले वर्तन योग्य नाही. या घटनेची दखल घेतली गेली पाहिजे. वर्षभरातील तीन मोठ्या घटनेमुळे कोकणवासीय उद्ध्वस्त झाले आहेत. यासाठी आता आऊट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करायला हवा. कोल्हापूर आणि सांगलीतील महापुरावेळी जीआर बदलून मदत केली होती. तशीच मदत आता करायला हवी, असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले. 

“पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करू नये”; नारायण राणेंवर काँग्रेसचे टीकास्त्र

मनसे शत्रूपक्ष नाही, पण...

मनसेसोबतच्या युतीबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता, मनसे शत्रूपक्ष नाही. पण, त्यांची भूमिका मान्य नाही. भाषेच्या आधारे त्यांनी भूमिका बदलली. हिंदुत्ववादी भूमिका महत्त्वाची आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. दुसरीकडे साखर कारखाने जगले पाहिजेत. ज्यांनी बुडवले त्यांना मदत द्यायची आणि बुडवणाऱ्यांना संधी का द्यायची, अशी विचारणा करत हे योग्य नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना नमूद केले. 

लोकसभेत खासदारांचे संख्याबळ १००० होणार? मोदी सरकारचा प्रस्ताव; काँग्रेसचा मोठा दावा

दरम्यान, सोलापूरमधून मराठवाड्याला पाणी कस नेता येईल याबाबत वर्ल्ड बँक सोबत बैठकीत प्रस्ताव होता. त्यावर सरकारने विचार करायला हवा. तसेच कोल्हापूर, सांगली, सातारा अजूनही पाण्याखाली असल्याचे समजले. आलमट्टी धरणातून ५ ते ६ लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे या परिसरात पूरपरिस्थिती निर्माण होते, असे फडणवीस म्हणाले. 
 

Web Title: devendra fadnavis criticized bhaskar jadhav over chiplun flood incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app