शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

संजय राऊत यांचे वक्तव्य डॉक्टरांच्या जिव्हारी लागणारे, देवेंद्र फडणवीस यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 7:23 PM

डॉक्टर हे स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करत आहेत. अशा स्थितीत संजय राऊत यांचे वक्तव्य डॉक्टरांच्या जिव्हारी लागणारे आहे. असे वक्तव्य करणे योग्य नाही, असे प्रतिपादन फडणवीस यांनी केले.

नागपूर - डॉक्टरांसंदर्भात शिवसेनेचे खा.संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावर टोकाची प्रतिक्रिया टाळली आहे. मात्र डॉक्टर हे स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करत आहेत. अशा स्थितीत संजय राऊत यांचे वक्तव्य डॉक्टरांच्या जिव्हारी लागणारे आहे. असे वक्तव्य करणे योग्य नाही, असे प्रतिपादन फडणवीस यांनी केले. सोमवारी फडणवीस यांनी नागपूर महानगरपालिकेत मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.नागपुरसह राज्यात 'कोरोना'मुळे वाढणारे मृत्यू हे गंभीर आहेत. शिवाय आॅगस्ट महिन्यात 'कोरोना'बाधितांची संख्यादेखील प्रचंड वाढली आहे. दिल्लीचा अनुभव लक्षात घेता राज्यभरात चाचण्यांची संख्या वाढविणे अनिवार्य झाले आहे. नागपुरसारख्या शहरात दररोज पाच हजारांहून अधिक संशयितांची चाचणी झाली पाहिजे. चाचण्या वाढल्यानंतर रुग्णांची संख्या वाढेल व त्यांच्यासाठी तशी व्यवस्थादेखील करावी लागेल, असे फडणवीस म्हणाले.पुढील महिन्याभराचा काळ नागपुरसाठी गंभीरनागपुरात मृत्यूचे व 'कोरोना'बाधितांचे प्रमाण वाढलेले आहे. यासंदर्भात योग्य नियोजन करुन पावले उचलायला हवे. एकूणच पुढील महिन्याभराचा काळ नागपुरकरांसाठी गंभीरच आहे. लवकर निदान होणे गरजेचे आहे. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.'जम्बो सेंटर'कामाचे नाहीनागपुरात 'कोरोना'वर उपचारासाठी 'जम्बो सेंटर' कामाचे राहणार नाही. त्यापेक्षा विकेंद्रीकरण करत मध्यम स्वरुपाचे केंद्र उभारले गेले पाहिजे. ज्या रुग्णांना लक्षणे नाहीत त्यांना घरीच ठेवून त्यांचे समुपदेशन झाले पाहिजे. यासाठी डॉक्टर 'व्हिडीओ कॉल'च्या माध्यमातून संपर्क साधू शकतात. तर उरलेल्या ३ ते ४ टक्के गंभीर रुग्णांसाठी उपचाराची व्यवस्था उभी झाली पाहिजे, अशी सूचना मी केली असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. खाजगी संस्थांसोबत 'कोव्हिड केअर सेंटर' उभारता येतील. आवश्यकता भासली तर 'नॉन कोव्हिड' इस्पितळांना त्यांच्यासोबत जोडता येईल. थोडी तयारी केली तर २० ते २५ दिवसात स्थिती नियंत्रणात येईल, असेदेखील ते म्हणाले.राहुल गांधी यांना गंभीरतेने घेत नाही'फेसबुक'संदर्भातून राहुल गांधी यांनी भाजपावर आरोप लावले आहेत. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केली असता आम्ही राहुल गांधी यांना गंभीरतेने घेत नाही असे उत्तर त्यांनी दिले. राहुल गांधी काहीही आरोप लावतात. त्यांना आम्हीच काय कुणीही गंभीरतेने घेत नाही, असे फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSanjay Rautसंजय राऊतCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस