शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

राज्यपाल साहेब, महाराष्ट्रात हस्तक्षेप करा, राज्य वाचवा; भाजपाच्या शिष्टमंडळाकडून 100 प्रकरणांची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 11:23 IST

BJP delegation met Governor: राज्यपालांना भेटून आल्यानंतर भाजपाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. गृहमंत्री अनिल देशमुखांना एक क्षणही पदावर राहण्याचा हक्क नाही. शरद पवारांनी दोन पत्रकार परिषदा घेतल्या. त्यांना वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला.

पोलिसांना कायदा सुव्यवस्थेचे संरक्षण करण्यासाठी वापरण्याऐवजी पक्षाच्या वसुलीसाठी(police) वापरले जात आहे. राज्यातील एकंदरीत परिस्थितीमध्ये लक्ष घालावे आणि राज्य वाचवावे, अशी विनंती विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantivar) यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. (We requested Governor to ask for a report from Maharashtra Chief Minister on various issues related to governance and corona in the state. We also requested him to intervene in corruption-related issue: Sudhir Mungantiwar, Maharashtra BJP)

अधिकाऱ्यांमध्ये आतंक आहे. त्यांना बदलीची आणि कारवाईची भीती दाखविली जात आहे. राज्यामध्ये भ्रष्टाचार, बदल्यांचे रॅकेट आहे अशी या ठाकरे सरकारची 100 प्रकरणे राज्यापालांना दिल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.  जे गोपनिय अहवाल सांभाळू शकत नाहीत, ते राज्य काय सांभाळणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. राज्यपालांना भेटून आल्यानंतर भाजपाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. 

गृहमंत्री अनिल देशमुखांना एक क्षणही पदावर राहण्याचा हक्क नाही. शरद पवारांनी दोन पत्रकार परिषदा घेतल्या. राज्यात घडत असलेल्या मोठ्या घटनांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत का नाही. राज्यपालांनी त्यांना बोलते करायला हवे. वसुली, बदल्यांचे रॅकेट या घटना धक्कादायक आहेत. मुख्यमंत्री यावर काहीच बोलत का नाहीत, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. पवारांनी त्यांच्या मंत्र्याला वाचविण्याचाच प्रयत्न केला. 

एवढे मोठे रॅकेट बाहेर आणले त्या अधिकाऱ्यावर कारवाई केली गेली, मात्र ज्यांनी ते रॅकेट केले त्यांच्यावर कारवाई नाही. काँग्रेसचे राज्यातील नेते वेगळं बोलतात, राष्ट्रीय नेते वेगळं बोलतात. काँग्रेसमध्ये मतमतांतरे आहेत. राज्यात काँग्रेसच अस्तित्वात नाही. महाराष्ट्रात कोरोना का वाढतोय? सरकार काय करतेय? राज्यपालांनी या साऱ्या प्रकरणांवर अहवाल मागवावा, त्यांना तो अधिकार आहे. या बाबतचे निवेदन आम्ही दिले असल्याचे फडणवीस म्हणाले.  अहवाल लवंगी फटाका की बॉम्ब ते लवकरच कळेल, असा इशाराही त्यांनी दिला. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीAnil Deshmukhअनिल देशमुखUddhav Thackerayउद्धव ठाकरेSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार